…तेव्हाच काँग्रेसवरची नाराजी दूर होईल, सत्यजित तांबेनी सांगितलं कारण
विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या संघर्षानंतर सत्यजित तांबे निवडून आले पण ते अपक्ष निवडून आल्यामुळे ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार कि अपक्ष राहणार, याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर सत्यजित तांबे यांनी आपण अपक्ष म्हणून निवडून आलो त्यामुळे अपक्ष म्हणून काम करणार, असं सांगितलं होतं.
पण या मुद्द्यावर आता सत्यजित तांबे यांच्या यांच्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सत्यजित तांबे काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी (Satyajeet Tambe) अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली होती.
Ajit Pawar : कुठलाही भूकंप सांगून येत नाही, बंडावर अशोक चव्हाणांचं सूचक वक्तव्य
सत्यजीत तांबे यांनी कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट देत अभिवादन केलं. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की ” पक्षातून निलंबन केल्यापासून पक्षातील कोणीही चर्चेसाठी बोलावलं नाही. मला चर्चेला बोलावलं तर पक्षावरची नाराजी दूर होईल.”
ते पुढे म्हणाले की, “माझे काँग्रेसच्या वरिष्ठांशी मतभेद झाले नाहीत. कोणाशी मतभेद असण्याचं कारणही नाही. निवडणुकीच्या काळात घडलेल्या घटनांबद्दल अनेक माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे. तेव्हा काही ठराविक लोकांनी गैरसमज निर्माण केलं. त्यातून पक्षाने माझ्यावर कारवाई केली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…मी काय अजित पवार यांचा प्रवक्ता नाही
“मात्र, पिढ्यां-पिढ्या आम्ही काँग्रेसमध्ये काम करणारी लोक आहोत. आमच्या कुटुंबाला काँग्रेसमध्ये १०० वर्षे होत आहेत. मी सुद्धा २२ वर्ष काँग्रेसच्या विद्यार्थी आणि युवक चळवळीत काम केलं आहे. त्यामुळे आम्हाला ढकलून देण्याचा प्रयत्न काही लोकांकडून झाला. त्याविरोधात आमची लढाई होती आणि ती अजूनही चालूच आहे,” असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं.