पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वतःचा करिष्मा निर्माण केला. त्याआधी काश्मीर ते कन्याकुमारी असा करिष्मा भाजपचा नव्हता. त्याच श्रेय नरेंद्र मोदी यांनाच जातं. असं म्हणत अजित पवार (ajit pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच कौतुक केलं आहे. ते मुंबई मध्ये आज पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते.
यावेळी देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यावर अजित पवार यांना प्रश्न विचारला गेला. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, २०१४ साली त्यांची डिग्री बघून लोकांनी त्यांना निवडणून दिल का? त्यांनी देशात स्वतःचा करिष्मा निर्माण केला. त्याआधी काश्मीर ते कन्याकुमारी असा करिष्मा भाजपचा नव्हता. त्याच श्रेय नरेंद्र मोदी यांनाच जातं. असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी यांच कौतुक केलं.
Uddhav Thackeray ; आपण ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्याचा अभिमान मोदींना का नसावा?
ते पुढे म्हणाले की आजवर आपल्या देशात अनेक नेते, मुख्यंमत्री झाले. ज्यांची शैक्षणिक पात्रता कमी होती. पण आपण बहुमताला किंमत देतो. ज्याचं बहुमत असतं, त्याला सत्ता मिळते. ते त्या पदावर बसतात. त्यामुळे ते प्रश्न महत्वाचे नाहीत. असं त्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की आपल्याकडे अनेकदा मंत्राच्या डिग्री आणि त्याबद्दलचे प्रश्न उपस्थित केले जातात. पण राज्याच्या किंवा देशाच्या दृष्टीने ते प्रश्न महत्वाचे नाहीत.
आज महागाई, बेरोजगारी हे प्रश्न महत्वाचे आहेत. गॅसच्या किंमती वाढत चालल्या आहेत. राज्यात नोकरभरती होणार होती, ती झाली नाही. असे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. असा टोला देखील त्यांनी लगावला.
“आओ चोरों बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा” संभाजीनगरच्या सभेवर रावसाहेब दानवेंनी टीका
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून मोदींच्या डिग्रीचा विषय चर्चेचा ठरला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री बोगस असून त्यांनी ती सार्वजनिक करावी, अशी मागणी केली होती. यावरुन गुजरात न्यायालयाने त्यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
केजरीवाल यांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने गुजरात विद्यापीठाला मोदींची डिग्री सार्वजनिक करण्याचे आदेश दिले होते. यावरुन गुजरात न्यायालयाने या निर्णयाला रद्द ठरवले आहे व केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.