Download App

Video : धनुभाऊ, पंकजांच्या बीडमध्ये अजितदादांचा हिरमोड; भाषणाला उभं राहताच व्यक्त केली नाराजी

येत्या 13 मे रोजी लोकसभेतील विविध मतदारसंघात लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.

  • Written By: Last Updated:

बीड : येत्या 13 मे रोजी लोकसभेतील विविध मतदारसंघात लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यासाठी आज बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) प्रचारसभेत उपमुख्यमंत्र अजित पवारांनी (Ajit Pawar) भाषणा उभं राहताच उघडपणे नाराजी बोलून दाखवली. (Ajit Pawar peech For Pankaja Munde In Beed)

सरकारी कर्मचाऱ्यांना ‘सुप्रीम’ दणका! सेवानिवृत्त वडिलांच्या घरात राहत असाल तर घरभाडे भत्ता विसराच

अजितदादा म्हणाले की, आजची बीडमधील सभा ही महायुतीची सभा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. संयोजकांनी महायुतीच्या सभेला होणारी गर्दी लक्षात घेता सभास्थळी मंडप टाकला पाहिजे होता. मंडप कमी टाकल्याने सभेला उपस्थित राहिलेले माझी माणसं आणि मतदार भर उन्हात उभी आहेत. यासाठी मी पूर्णपणे संयोजकांना जबाबदार धरेन असे म्हणत अजितदादांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी अजितदादांनी दुसऱ्या का तिसऱ्या टप्पातील प्रचारादरम्यान उन्हामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यामुळे सर्वांनी वाढत्या उन्हात काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

वर्ष दोन वर्षांचं सरकार अन् आघाडी पॉलिटिक्स फेल; इतिहासातील ‘सरकारं’ही औटघटकेची..

सभेला संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, 1967 साली याच मतदारसंघाने क्रांतिसिंग नाना पाटील यांना लोकसभेत निवडणून पाठवल्याची आठवण अजित पवारांनी सांगितली. पाटील हे सांगली साताऱ्याचे होते. परंतु, जनहितासाठी नेतृत्त्व करणाऱ्यांना हा मतदारसंघ कायम साथ देत आलेला आहे. सर्व जातीधर्मांमध्ये बंधूभाव टिकून रहावा यासाठी छोटा जर घटक असला तरी त्याला न्याय देण्यासाठी महायुतीचं सरकार आणि कार्यकर्ते काम करत आहेत. ही निवडणूक भावनिकतेची नसून देशाचं भवितव्य घडवणारी आहे. आपल्या सर्वांना महायुतीच्या माध्यामातून बीडच्या मागासलेपणा शिक्का मिटवून टाकायचा आहे.

छ.संभाजीनगरमध्ये मतदानापूर्वी जोरदार राडा; एकमेकांच्या अंगावर जात मनसे अन् ठाकरे गट भिडले

पुण्याच्या सभेत खूर्ची सोडली अन् ताडकन मोदींच्या बाजूला जाऊन बसलो

पुढे बोलताना अजितदादा म्हणाले की, ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. त्यामुळे राज्यातील विविध मतदारसंघात मोदींच्या प्रचारसभांचे आयोजन केले जात आहे. नुकतीच शिरूर, बारामती, पुणे आणि मावळच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा पार पडली. त्यासभेत मोदींच्या आगमनापूर्वी आमच्या सर्वांची भाषणं उरकून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. फक्त राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे मोदींसमोर भाषण करणार होते. त्या ठिकाणी मंचावर शिंदेंच्या बाजूला माझी आणि शिंदेंच्या डाव्या बाजूला मोदींची खूर्ची होती. शिंदे ज्यावेळी भाषणाला उठले त्यावेळी मी माझी खूर्ची सोडली आणि मोदींच्या बाजूला येऊन बसलो. मोदींच्या बाजूला मी गावच्या गप्पा मारायला नव्हतो बसलो तर, कांद्यावर टाकण्यात आलेली निर्यात बंदी उठवावी हे सांगण्यासाठी बसल्याचे अजित पवार म्हणाले. त्यावेळी मोदींनी अजित काळजी करू नकोस दिल्लीत जाताच मी कांद्यावरील निर्यात बंदी उठवतो असा शब्द दिला. त्याप्रमाणे मोदींनी कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची घोषणा केली.

Uddhav Thackeray On PM Modi : मोदींच्या एनडीएत येण्याच्या ऑफरवर उद्धव ठाकरे म्हणाले, डोळा मारलाय पण…

शेतकरी तुमची माझी जात

अजित पवार म्हणाले की, मी देखील शेतकरी आणि तुम्हीदेखील शेतकरी आहात. शेतकरी तुमची माझी जात असून, दुसरी कुठली जात आपली नाहीये. मात्र, काहीजण राजकीय पोळी भाजून घेण्याकरता आम्ही अमकं आम्ही तमकं असे सांगतात. काही जण आम्ही 96 कुळी मग आम्ही काय 92 कुळी वाटलो की काय? असा सवाल अजितदादांनी विरोधकांना उपस्थित केला. आम्हालापण बोलता येतं पण आम्ही तारतम्या ठेवून बोलत असतो. कारण स्व. यशवंतराव चव्हाणांची आम्हाला शिकवण आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने बोलणाऱ्यांनी भान ठेवणे गरजेचे आहे.

follow us

वेब स्टोरीज