Ajit Pawar On Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या ‘2004 साली राष्ट्रवादी पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता.’ या वक्तव्यावरून सुनावलं आहे. त्यांनी म्हटलं की, पवारांचं वक्तव्य धादांत खोट आहे. 2004 साली पक्ष स्थापन होऊन 14 -15 वर्ष झाले होते. कोणीही नवखं नव्हतं किंवा अनुभवीही नव्हतं. तसेच त्यांनी शरद पवार यांचा 2004 साली राष्ट्रवादी पक्षाचा मुख्यमंत्री न करण्याचा निर्णय किती चुकीचा होता? हे सांगितलं आहे. अजित पवार हे मुंबईमध्ये पक्षाच्या कार्यकारणी बैठकीमध्ये बोलत होते.
Bhumi Pednekar: पर्यावरण जागृतीसाठी अभिनेत्रीने सुरू केली, ‘भूमी नमस्कार’ मोहिम
अजित पवार म्हणाले की, पवार साहेबांनी मध्यंतरी 2004 बद्दल एक वक्तव्य केलं. ते म्हणाले की, ‘2004 साली जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता.’ हे धादांत खोटं आहे. मात्र मला, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल पटेल आम्हा सर्वांना वाटत होतं ते करावं. तसेच मी त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नव्हतो.
ससूनमधील डॉक्टरला कोणी मॅनेज केले? आमदार सुनील टिंगरे यांचीही चौकशी होण्याची शक्यता
पण मला वाटत होतं छगन भुजबळ हे मुख्यमंत्री होतील. कारण पक्षाची स्थापना झाल्यापासून राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष पोहोचवण्याचं काम छगन भुजबळ यांनी केलं. भुजबळ यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटत पक्ष वाढवला. तरी देखील राष्ट्रवादीला 58 तर काँग्रेसला प्राचारही न करता 75 जागा मिळाल्या. तर मात्र 2004 ला सर्वांच्या चांगल्या कामगिरीमुळे राष्ट्रवादीकडे संधी आली. मात्र आपले वरिष्ठ नेते आता म्हणतात की, काही लोक नवीन होते. म्हणून मुख्यमंत्रीपदाची संधी नाकारली. मात्र पक्ष स्थापन होऊन 14 -15 वर्ष झाले होते. कोणीही नवखं नव्हतं किंवा अनुभवीही नव्हतं.
पण मला अशी बातमी कळाली आहे की, सुधाकरराव नाईक यांना 1991 साली मुख्यमंत्री केलं. तेव्हा त्यांनी पवार साहेबांचं एक वर्ष देखील ऐकले नाही. त्यावेळी नाईक यांनी ‘सावज टप्प्यात आले की आपण ते उडवतो’ अशा प्रकारची त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली. तसेच मंत्रिमंडळातील 17 लोकांची हकालपट्टी केली. कदाचित त्यामुळेच 2004 ला पवार साहेबांनी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद घेतलं नाही. पण 2004 ला जर मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आला असता तर त्यानंतर कायम राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री राहिला असता. असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या