Download App

Shalinitai Patil : अजित पवार हे भ्रष्टाचारी, त्यांना पक्षाध्यक्ष पद देणं अयोग्य

Ajit Pawar Scammer, Former MLA Shalinita Patil Statement : शरद पवारांनी (Sharad Pawar) दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (NCP) अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची सांगत निवृत्तीची घोषणा केली. सध्या त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी कार्यकर्त्यांकडे 2-3 दिवसांचा वेळ मागितला आहे. मात्र, ते राजीनामा कितपत मागे घेतली, याविषयी शंका आहे. पवार यांनी निवृत्ती स्वीकारल्यावर NCP बरोबरच महाविकास आघाडीत कमालीची अस्वस्थता आहे. दरम्यान, पवारांच्या या निर्णयामुळं पवारांच्या जागी आता कोण राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष होणार, याविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहे. पुढचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे दरम्यान, पक्षाध्यक्षपदासाठी अजित पवार (Ajit Pawar) की सुप्रिया सुळे (Supriya Sule) अशी चर्चा सुरू असताना माजी आमदार शालिनीताई पाटील (Shalinitai Patil) यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप करत मोठं वक्तव्य केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर अध्यक्षपदासाठी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची नावे पुढे आली. मात्र, शालिनीताई पाटील यांनी सुप्रिया सुळेंना पंसती देत अजित पवार हे घोटाळेबाज आणि गुन्हेगारीत गुंतलेले नेते आहेत, अशी टीका केली आहे.

काय म्हणाल्या शालिनिता पाटील?
शरद पवार माझ्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहेत. मी अजूनही कामकाज सांभाळते. त्यामुळेच शरद पवारांनी घाईघाईत निवृत्तीचा निर्णय घेतला, असं शरद पवार यांच्या निर्णयावर शालिनीताई पाटील यांनी मत व्यक्त केले.

तसेच अजित पवार हे घोटाळेबाज आणि गुन्ह्यात गुंतलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांना अध्यक्षपद देणे चुकीचे ठरेल. अशी टीकाही शालिनीताई पाटील यांनी केली आहे.

Maharashtra Politics : नव्या सरकार स्थापनेचा मुहुर्त ठरला? सरोदेेच्या दाव्याने खळबळ

अजित पवार यांना भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याचा पाठिंबा आहे. त्यामुळे ईडीने अद्याप त्याची चौकशी केलेली नाही. हसन मुश्रीफ यांची चौकशी केली जाते.  मग 1400 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अजित पवारांना चौकशीसाठी का बोलावले जात नाही? असा  सवाल त्यांनी उपस्थित केला.

यासोबतच अध्यक्षपदाबाबत बोलताना शालिनीताई पाटील यांनीही राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे यांना करावे, असे मत व्यक्त केले.

शरद पवार यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत पवारांनी फेरविचार करण्याची मागणी केली. दरम्यान, शऱद पवार नेमकी काय भूमिका घेतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us