Sharad Pawar : अजित पवार माझा पुतण्या, कुटुंबातील व्यक्तीने वडिलमाणसाला भेटणं त्यात गैर काय? असा उपरोधिक सवाल करीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुप्त भेटीचा खुलासा केला आहे. दरम्यान, काल शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील एका व्यावसायिकाच्या निवासस्थानी भेट झाली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा सस्पेंस निर्माण झाला होता. अखेर आज शरद पवारांनी पत्रकार परिषदेत भेटीवर आपली भूमिका मांडली आहे.
शरद पवार म्हणाले, अजित पवार माझा पुतण्या आहे, कुटुंबातील व्यक्तीने वडिलमाणसाला भेटण्यात गैर काय? ही गुप्त भेट नव्हती तर उघड असल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे. तसेच माध्यमांना उद्योग नाही म्हणूनच राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाल्याचं मिश्किल अंदाजात टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार यांनी आपल्यासोबतच्या नेते व आमदारांसह शरद पवारांची काल व आज भेट घेतली होती. भेटीमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून येत होतं. एकीकडे राष्ट्रवादीतील काही नेतेमंडळी एकमेकांवर कडाडून टीका करत असताना अशा प्रकारे शरद पवारांची दोनदा भेट घेण्याचे काय कारण आहे, यामुळे संभ्रम निर्माण झाला.
Sharad Pawar : राष्ट्रवादी भाजपसोबत? शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला…
राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अजित पवारांनी वय झालं, कधी तरी थांबणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला होता. तर मी राष्ट्रवादीमध्ये नेता म्हणून आलो, पक्षामुळे नेता झालो नाही, असं छगन भुजबळ म्हणाले होते. तसेच सुनील तटकरे म्हणाले, मी राष्ट्रवादीत येण्यापूर्वी राजकारणात होतो. काँग्रेसने मला उमेदवारीही दिली होती.
अभिनेता करण कुंद्राची माणुसकी कॅमेऱ्यात कैद, नेटकऱ्यांनी केलं कौतुक
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्योरोप सुरु असतानाच काल व आज सलग दोन दिवस राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी शरद पवारांची भेट का घेतली यावर चर्चा रंगली होती. शरद पवार आमचे दैवत असून आम्ही त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचं स्पष्टीकरण अजित पवार यांच्या गटाकडून देण्यात आलं होतं.
दरम्यान, या भेटींनंतर शरद पवारांच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानंतर शरद पवारांनी भेटीबद्दल पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.