कृष्णा औटी
मुंबई : वय झालेल्या शरद पवारांना घरी बसा असा सल्ला देणाऱ्या अजित पवारांना (Ajit Pawar) अखेर पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्याची अधिकृत घोषणा निवडणुक आयोगाने केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंप्रमाणेच आता शरद पवारांनादेखील (Sharad Pawar) आगामी काळात नव्या चिन्ह आणि नावासोबत मैदानात उतरावे लागणार आहे हे नक्की. मात्र चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर अजितदादांचा डोळा आता मुंबई, पुणे आणि बारामतीमधील पक्ष कार्यालयांसह पक्षाच्या फंडांवर असून, यासाठी अजितदादा लवकरच दावा ठोकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता अजितदादा पवारांना आर्थिकदृष्ट्यादेखील कमकुवत करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहेत.
‘बुजुर्ग काकांचा पक्ष हिसकावणं सोप्पं आहे पण’.. ‘मनसे’नेही अजितदादांना सुनावलं
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्हावर दावा केला त्याच पावलावर पाऊत टाकत अजितदादांनीदेखील राष्ट्रवादीवर ताबा मिळवला. पण ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत वेगळा मार्ग निवडला त्यावेळी शिंदेंनी केवळ पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा ठोकला होता. त्यात ते यशस्वीदेखील झाले. पण शिंदेंनी शिवसेनेच्या कोणत्याही फंडांवर तसेच कार्यालयांवर दावा केला नव्हता. परंतु, शिंदेंना मागे टाकत आता अजितदादांनी पवारांना पूर्णपण चितपट करण्यासाठी पक्षाच्या कार्यलयांसह फंडांवर दावा ठोकण्याची रणनीती आखली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
ठाकरेंनी सोडली ‘साथ’ तर संकटात येईल आघाडीचा ‘हात’; ‘बिहार’नंतर महाराष्ट्रात कशाची चर्चा?
आता डोळा पक्ष कार्यालय अन् फंडावर
शरद पवारांनी सुरू केलेल्या राष्ट्रवादी पक्षाची कार्यालये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात आहेत. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. बारामती, पुणे, मुंबई येथील पक्ष कार्यालये अधिक सक्रीय आहेत. त्यामुळे आता पक्षाचे नाव आणि चिन्ह अधिकृतपणे मिळाल्यानंतर आता अजित पवार राज्यातील प्रमुख कार्यालयांवर दावा ठोकणार आहेत. त्यासाठी रणनीतीदेखील तयार करण्यात आल्याची माहिती आहे. अजित पवार केवळ पक्ष कार्यालयांवरचं नव्हे तर फंडावरदेखील दावा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Sharad Pawar : शरद पवार गटाचं पक्षचिन्ह अन् नाव ठरलं; ‘या’ नावांतून एक होणार फायनल
पण, अजितदादांच्या बंडानंतर पक्षाकडे जो काही पैसा होता हा सर्व पैसा ट्रस्टवर वळविण्यात आला आहे. या ट्रस्टवर शरद पवार हे अध्यक्ष आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने शिवसेनेतील बंडानंतर केवळ पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळाले त्याप्रमाणे राष्ट्रवादीकडे असलेल्या सर्व प्रॉपर्टी आणि पैसे हे पवारांकडेच राहू शकतात. पण, या ट्रस्टवर सध्या प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे स्वतः अजित पवार तर, शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे कमिटीवर सदस्य आहेत. त्यामुळे हा सर्व पैसा नेमका पवारांच्या ताब्यात राहणार की, ठरल्याप्रमाणे अजितदादा दावा ठोकणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
sujay vikhe : मोदींसोबत विखे कुटुंबाचा फोटो, उमेदवारीचे टेन्शन गेले?
कोणत्या कार्यालयांवर करू शकतात दावा?
मुंबईतील राष्ट्रवादीचे कार्यालय बल्लार्ड इस्टेट येथे आहे. हे कार्यालय सरकारी जागेवर आहे. त्यात सध्या अजित पवार सत्तेत आहेत. त्यामुळे अजित पवार सर्वात आधी याच कार्यालयावर दावा ठोकण्याच्या विचारात आहेत. याशिवाय बारामती आणि पुण्यातील कॉर्पोरेशन भागातील कार्यालयांवर दावा अजितदादांकडून केला जाऊ शकतो. आता ही कार्यालये मिळवण्यासाठी अजितदादा कोणत्या बाबींवर कशा पद्धतीने दावा ठोकतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.