Download App

कोणालाच वाटलं नव्हतं एकनाथ शिंदे अशा पद्धतीने मुख्यमंत्री होतील, पण ते झाले

Ajit Pawar Speak On Eknath Shinde : राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांचे बॅनर अनेक ठिकाणी झळकले होते. आता यावर खुद्द पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पवार म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीची अपेक्षा केलेली आहे. असे बॅनर लावून पुढे मुख्यमंत्री होत येत नसतं. मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ असणे आवश्यक आहे. कोणालाच वाटलं नव्हतं की एकनाथ शिंदे अशा पद्धतीने मुख्यमंत्री होतील पण ते झाले असे म्हणतच अजित पवारांनी शिंदेंना टोला लगावला.

गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार हे पक्षात अस्वस्थ आहे, अशा चर्चा रंगल्या होत्या. यातच ते भाजपसोबत जातील असेही म्हंटले जात होते. या चर्चाना खुद्द अजित पवार यांनी पूर्णविराम दिला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे पोस्टर झळकवले होते. यावरच बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना एक सल्ला दिला आहे.

अजित पवार म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीची अपेक्षा केलेली आहे. असे बॅनर लावून पुढे मुख्यमंत्री होत येत नसतं. मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ असणे आवश्यक आहे. 145 ची मॅजिक फिगर गोळा करावी लागतील. जी एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून ते मुख्यमंत्री झाले. म्हणजे कोणालाच वाटलं नव्हतं की एकनाथ शिंदे अशा पद्धतीने मुख्यमंत्री होतील पण ते झाले असे पवार म्हणाले.

तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले, मी सगळ्यांना आवाहन करीन. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सहकाऱ्यांना, तसेच कार्यकर्त्यांना आवाहन करेल की असं काही करू नका. तसेच आमच्या सासुरवाडीमध्ये माझ्यावर प्रेम करणाऱ्या सहकाऱ्यांना पण आवाहन आहे की असं करू नका. तुमचा हा अतिशय चुकीचा आग्रह असून त्याच्यातून काही होणार नाही.

‘मलाही मुख्यमंत्री व्हावं, असं वाटतं’… अजित पवारांपाठोपाठ आठवलेंनी व्यक्त केली इच्छा

आपलं आपलं काम करत चला, आमदारांची संख्या वाढवा, जिथे जेवढे जास्त आमदार तुमच्या विचाराची निवडून येतील तेव्हा तुम्हाला अशी पद मिळायला जर वरिष्ठांनी आशीर्वाद दिले आणि आमदारांनी तुमचं सिलेक्शन केलं तर तुम्ही त्या पदावर जाऊ शकता असे प्रतिपादन अजित पवार यांनी केले आहे.

Tags

follow us