‘मलाही मुख्यमंत्री व्हावं, असं वाटतं’… अजित पवारांपाठोपाठ आठवलेंनी व्यक्त केली इच्छा
Ramdas Athawale Wants TO Become CM : राज्यात सध्या आगामी मुख्यमंत्री पदासाठी दावेदारी सुरु आहे.राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर देखील झळकले होते. यातच खुद्द अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता अजित पवारांपाठोपाठ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘मलाही मुख्यमंत्री व्हावं, असं वाटतं’ असं आठवले म्हणाले आहेत.
सांगलीमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना आठवलेंनी हे विधान केले आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी अजित पवारांवर भाष्य करत त्यांच्यावर टीका देखील केली. मुख्यमंत्री पदाच्या चढाओढीतून भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागणे हे हास्यास्पद आहे, असं आठवले म्हणाले.
आठवले म्हणाले की, अजित पवारांना तिकडे संधी मिळेल, असे वाटत नाही. तसेच आम्हाला त्यांची आवश्यकता नाही. अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यात चढाओढ सुरू आहे. पण जोपर्यंत एकनाथ शिंदे आहेत, तोपर्यंत दुसऱ्या कोणाचा नंबर लागणार नाही. शरद पवार यांनी एनडीए सोबत यायला पाहिजे, मी आलो आहे. तर पवार यांनी यायला हरकत नाही. असे म्हणतच आठवले यांनी पवारांना एनडीए सोबत येण्याची ऑफर दिली.
शरद पवार यांनी आता ठोसपणे निर्णय घ्यावा. त्याच बरोबर ज्यांनी यायचे आहे, असे सांगण्या पेक्षा शरद पवारांनी आमच्या सोबत यावे. उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होणाऱ्या टीकेवर बोलताना मंत्री आठवले म्हणाले, ठाकरे हे आमचे मित्र आहेत. तसेच ठाकरे सुसंस्कृत देखील आहेत. पण त्यांनी बोलताना भान ठेवून बोलावं,असा सल्ला आठवले यांनी दिला आहे.
कुस्तीगीरांचा निषेध : भाजप खासदार ब्रिजभूषणच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल होणार
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या घटना घडू लागल्या आहेत. यातच दरदिवशी भावी मुख्यमंत्री म्हणून नवं नवीन नेत्यांची नावे पुढे येऊ लागली आहे. खारघर घटनेवरून शिंदे सरकार अडचणीत येईल व राज्यात पुन्हा सत्ताबदल होईल असे अनेक तर्कविर्तक सध्या राजकीय वर्तुळात रंगली जात आहे.