कुस्तीगीरांचा निषेध : भाजप खासदार ब्रिजभूषणच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल होणार

कुस्तीगीरांचा निषेध : भाजप खासदार ब्रिजभूषणच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल होणार

Women Wrestlers Sexual Harassment Complaint : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह हे गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडले आहे. सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. तेव्हा दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.

दिल्ली पोलीस आज या प्रकरणी एफआयआर नोंदवणार आहे. दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे. महिला कुस्तीपटू ब्रिजभूषण यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी करत असून या मागणीसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही दिल्ली पोलिस आज एफआयआर दाखल करणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून संपावर बसलेल्या महिला कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात एफआयआर नोंदवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कुस्तीपटूंनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, त्यावर न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली होती. आज झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी आज एफआयआर दाखल करणार असल्याचे न्यायालयाला सांगितले.

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी महिला कुस्तीपटूंच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयात केले. दिल्ली पोलिसांच्या वतीने न्यायालयात हजर झालेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, या सर्व प्रकरणांची पोलिसांकडून चौकशी केली जाईल. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देशही दिले. या प्रतिज्ञापत्रात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना कराव्यात, याची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच दिल्ली पोलिसांनी अल्पवयीन मुलींना असलेल्या धोक्याचाही आढावा घ्यावा, असेही ते म्हणाले.

जाणून घ्या प्रकरण काय आहे
ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगट यांच्यासह अनेक कुस्तीपटू कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. महिला कुस्तीगीरांचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे, तसेच कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर हुकूमशाही चालवल्याचा आरोप आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube