Download App

बदल्यांचे रेटकार्ड ते पोलिस खात्यात राजकीय हस्तक्षेप, अजित पवारांनी सगळचं काढलं

AJit Pawar News : सत्ताधारी सरकारचा पोलिस खात्यात राजकीय हस्तक्षेप ते सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रेटकार्डावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला चांगलचं धारेवर धरलं आहे. पत्रकार परिषदेतच अजित पवारांनी राज्य सरकारच्या कारनाम्यांचा पर्दाफाश केला आहे. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे वक्तव्य करीत सरकारचं सगळचं बाहेर काढलं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. (Ajit Pawar Speak On Transfers of officials to political interference)

राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा अन् संजय राठोड पोहोचले अमित शाहांच्या भेटीला

अजित पवार म्हणाले, राज्यातील सनदी अधिकाऱ्यांसह कृषी अधिकाऱ्यांच्या बदलीचे अधिकार सरकारने ठराविक आमदारांनाच दिले असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. या मुद्द्यावर भाष्य करताताना त्यांनी थेट हा संशोधनाचा मुद्दा असल्याचं म्हटलंय. अधिकाऱ्यांना अधिकार असले तरी मंत्रालयातून आलेल्या यादीतील अधिकाऱ्यांचेच अधिकार काढावेत, असे तोंडी आदेश असल्याचं अनेक अधिकाऱ्यांनी मला सांगितलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

राऊतांवर टीका करतांना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, एकेरी उल्लेख करत बाप काढला

तसेच मागे माजी खासदार राजू शेट्टी यांनीही बदलीचं रेटकार्ड मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पाठवलं होतं. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचा रेट किती, हे सांगितलं होतं. कुठल्या आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या सांगितल्यावर बदल्या होणार हेही ठरलं. हा अधिकार ठराविक आमदारांनाच दिला असून तेही बदली करायची की नाही यावर चर्चा करतात, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय.

Nivedita Saraf Post: निवेदिता सराफ यांनी मामांसाठी लिहलेली पोस्ट चर्चेत, “माय डार्लिंग, तू…,”

यासोबतच राज्य सरकारचा राज्याच्या पोलिस खात्यात हस्तक्षेप असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. राजकीय हस्तक्षेप कमी झाला तर काही गोष्टी आटोक्यात येणार आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था ठेवावी, सरकारने स्थानिक अधिकाऱ्यांना आदेश दिले तर समाजात तेढ निर्माण करणाऱ्याचा अधिकारी बंदोबस्त करणार असल्याचंही ते म्हणालेत.

दरम्यान, ठाणे जिल्ह्यात राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तिथले भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधीही त्रासून गेले असल्याचं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us