Download App

भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना अजित पवारांचा पूर्णविराम…

आज कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, उद्या विधानभवनातील कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचं स्पष्टीकरण राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलं आहे. दरम्यान, अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सातत्याने जोर धरत आहेत. त्यावर अजित पवारांनी ट्विटद्वारे आपली भूमिका स्पष्ट केलीय.

अजित पवार ट्विटमध्ये म्हणाले, माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार असल्याचं त्यांनी एका ट्विटद्वारे स्पष्ट केलं आहे.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी पक्षातील आमदारांच्या बैठकीवर स्पष्ट भूमिका मांडलीय. ते म्हणाले, मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी, असंही ते म्हणाले आहेत.

मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आलंय. अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अजित पवार दोन दिवस नॉट रिचेबल होते. त्याचंप्रमाणे केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी शाह यांची भेट घेतल्याच्याही चर्चा सुरु होत्या.

महाविकास आघाडीच्या सभेला युतीचे सभेने उत्तर? महाराष्ट्र दिनी मुंबईत सत्ताधारी पक्षाकडूनही सभा

अखेर आज अजित पवार यांचा नियोजित पुणे दौरा असताना अचानक रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात भूकंप होण्याचं अनेकांकडून बोललं जात होतं. आज अजित पवार यांच्या पुणे दौऱ्यात पुण्यातील सासवड, वडकी, दिवे, या गावांमध्ये ठरलेल्या कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं समोर आलंय.

अजितदादांना व्हायचंय मुख्यमंत्री; दिल्लीत लावली फिल्डिंग, पुण्यातले कार्यक्रम पुन्हा अचानक रद्द

तर दुसरकडे अजित पवारांनी सर्व गोष्टी बिनबुडाच्या असल्याचं म्हणत आज माझा कोणताही नियोजित दौरा नव्हता उद्या मी विधानभवनातील कार्यलयात उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. एकंदरीत आजची सर्व परिस्थिती पाहता राष्ट्रवादीचे काही आमदार मुंबईत दाखल झाले होते. आज पक्षाची महत्वाची बैठक बोलवली असल्याच्याही चर्चांना उधाण आलं. त्यावर मी कोणतीही बैठक बोलवली नसल्याचं त्यांनी म्हटंलयं.

दरम्यान, येत्या काळात राज्यात राजकीय भूंकप होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत, तर दुसरीकडे अजित पवारांच्या हालचालींवरुन राजकीय विश्लेषकांच्या नजरा आहेत. पुढील काळात अजित पवार भाजपमध्ये जाणार की महाविकास आघाडीमध्येच असणार? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. सध्या तरी अजित पवार राजकीयदृष्ट्या केंद्रस्थानी समजले जात असून ते नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us