NCP News : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं काय होणार? असा प्रश्न विचारला जात होता. राष्ट्रवादी आमदार (NCP News) अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर दोन्ही गटांची सुनावणी झाली. मात्र अजित पवार गटाकडून आणखी वेळ मागितल्याने सुनावणी लांबणीवर पडली आहे. नार्वेकर यांनी नवीन वेळापत्रक जाहीर करणार आहेत त्यानुसार आता या प्रकरणी 23 जानेवारीला सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आज फक्त अर्धा तास सुनावणी झाली. यानंतर अजित पवार गटाने आणखी वेळ देण्याची मागणी केली. या मागणीला शरद पवार गटाच्या वकिलांनी विरोध केला.
विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार गटाकडून मुदतवाढ मागण्यात आली. आमच्या वकिलांनी त्याला विरोध केला होता. पण, अध्यक्षांनी निर्णय घेतला. आता या प्रकरणात 23 जानेवारीपासून सुनावणी सुरू होईल. माझी साक्ष आज होईल असे वाटत होते. पण आता मुदतवाढ दिली गेली आहे. आम्ही जे कागदपत्र दाखल केले आहेत ते वाचण्यासाठी विरोधी पक्षाच्या वकिलांनी वेळ मागितला होता. तसेच अजित पवार गटाकडून नवीन कागदपत्र दाखल करण्यात आली. ती कागदपत्रे पाहण्यासाठी आमच्या वकिलांनी मागणी केली आहे त्यासाठी अध्यक्षांनी मान्यता दिली आहे.
Rahul Narvekar : भाजपमध्ये स्थिरावलेल्या राहुल नार्वेकर यांचा राजकीय प्रवास | LetsUpp Marathi
रोहित पवार यांना ईडीची नोटीस आली हे खरं आहे. मला खात्री आहे की ते या नोटिसीला समर्पक उत्तर देतील. रोहित पवार राजकारणात येण्याआधी उद्योजक होते. त्यांच्या काही कंपन्या आहेत. आता ईडीने जी माहिती मागितली आहे ती माहिती रोहित पवार उपलब्ध करून देतील. ईडीच्या कारवाईला ते उत्तर देतील असा मला विश्वास आहे.
भाजपनं तिकीट नाकाल्याने अनिल पाटील राष्ट्रवादीत
शरद पवार भाकरी फिरवण्यााचा उल्लेख वारंवार करत होते याचा अर्थ पक्षात अशांतता होती असे अनिल पाटील यांनी म्हटले होते असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता जयंत पाटील म्हणाले, अनिल पाटील 2019 लाच आमच्या पक्षात आले होते त्यामुळे भाकरी फिरवण्याचा आणि त्यांचा काहीच संबंध नाही. कारण, आमचा पक्ष कसा चालतो हेच त्यांना अजून माहिती नाही. भाजपने त्यांना तिकीट दिलं नाही म्हणून ते आमच्याकडे आले होते.
Sharad Pawar : आव्हाडांना दिल्लीत धाडणार; मविआच्या बैठकीचा पवारांनी सांगितला प्लॅन
उलट तपासणीसाठी शरद पवार गटाने पहाटे कागदपत्रे दिली- अनिल पाटील
आज नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे. 19 तारखेला 4 साक्षीदार यांची उलट तपासणी करण्यासाठी 19 तारखेला पहाटे 4 वाजता कागदपत्र दिली आहेत याला आम्ही आक्षेप घेतला आणि वेळ वाढवून मागितला आहे. शरद पवार सारखे बोलायचे की भाकरी फिरवली जाईल त्यांच्या या वक्तव्यावरून पक्षामध्ये मनमानी सुरू आहे हे सातत्यानं समोरं येत होतं. म्हणून प्रतिज्ञापत्रात तसा उल्लेख करण्यात आल्याचे अनिल पाटील म्हणाले. आमच्या काही आमदारांचे पुन्हा एकदा प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे.