शरद पवारांच्या परवानगीने अजित पवार भाजपात जाणार; रवी राणांचा खळबळजनक दावा, राणांनी वेळही सांगितली

Ajit Pawar will join BJP with the permission of Mr. Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अलिकडेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं बोलल्या जातं आहे. त्यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे […]

Untitled Design   2023 04 17T190058.263

Untitled Design 2023 04 17T190058.263

Ajit Pawar will join BJP with the permission of Mr. Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अलिकडेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं बोलल्या जातं आहे. त्यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी अजित पवार भाजपात आले तर त्यांचं स्वागतच आहे, असं विधान केलं होतं. त्यानंतर आता आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. शरद पवारांच्या परवानगीनेच अजित पवार भाजपमध्ये जातील, असं खळबळजनक दावा, राणा यांनी केला.

राणा यांनी सांगितले की, शरद पवार आणि पंतप्रधान मोदींचे कसे संबंध आहेत, हे महाराष्ट्रालाच नाही, तर अख्या देशाला ठाऊक आहेत. पवार हे मोदींचा आदर करतात, आणि मोदी देखील पवारांचा आदर करतात. आठ दिवसांपूर्वी शरद पवार म्हणाले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं डिग्री प्रकरण तसेच गौतम अदानी यांच्या चौकशीबाबत उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे जे काही बोलतात, ते मुद्दे महत्वाचे नाहीत. त्यामुळं पवार साहेबांच्या परवानगीने अजित पवार भाजपात जाणार. कारण, ते 33 महिन्यांच्या सरकारला कंटाळले होते. फडणवीस, शाह, मोदी यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळं जेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह हिरवा कंदील देतील, तेव्हा अजित पवार हे नॉटरिचेबल होतील आणि भाजपसोबत जातील, असं राणा यांनी सांगितलं. त्यांच्या या दाव्यामुळं राजकीय वर्तृळात चर्चांना उधान आलं आहे.

17 गोण्या कांदा विकून हातात आले अवघे 52 रुपये!, ‘सरकार, सांगा आम्ही जगायचं कसं ?’

मोदींच डिग्री प्रकरण, गौतम अदानी यांच्या जेपीसी चौकशीबाबत शरद पवारांनी विरोधकांचे कान टोलल्यानंतर राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार या चर्चांना उत आला होता. त्यानंतर अंजली दमानिया यांनी ट्विट करत अजित पवार हे भाजपसोबत जातील असं खळबळजनक विधान केलं होतं. शरद पवारांनी घेतलेली भूमिका पाहता आता
मोदी-शाह यांनी हिरवा कदील देताच अजित पवार नॉटरिचेबल होतील, आणि पवारांच्या परवानगीने भाजपात जातील, असं वक्तव्य राणा यांनी केलं. मात्र, अद्याप अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली नाही.

यावेळी बोलतांना राणा यांनी ठाकरेंवरही टीकास्त्र डागलं. राणा म्हणाले की, जेव्हा शरद पवारांनी एक वक्तव्यं केलं, तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊता या तिघांनी सिल्वर ओकवर जाऊन पवारांचे पाय पकडावे लागले होते. हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यांना माहित आहे की, पवारांनी उध्दव ठाकरेंच्या डोक्यावरचा हात काढला तर, ठाकरेंसोबत 2 आमदार राहणार नाहीत, अशी खोचक प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, अजित पवार भाजपात जाणार या चर्चेनंतर आता राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हे मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे. त्यातच मुंडे यांचा मोबाईल बंद असल्याने अजित पवार काय निर्णय घेतात, याचे गुढ वाढले आहे.

Exit mobile version