Download App

पुढच्या वज्रमूठ सभेत अजित पवारांची खुर्ची दिसणार नाही, शिंदे गटाकडून नवा दावा

  • Written By: Last Updated:

“महाविकास आघाडीकडून सध्या राज्यभरात एकत्रितपणे वज्रमूठ सभा घेतल्या जात आहेत. पण पुढील एक तारखेच्या वज्रमुठ सभेत अजित पवारांची खुर्ची दिसणार नाही. अजित पवार लवकरच सरकारमध्ये सहभागी होणार आहेत,” असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा नव्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरून राज्यातील राजकारण तापलं होतं. यानंतर थेट अजित पवार यांनीच समोर येत ही कोंडी फोडली आणि आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केलं. त्यानंतर या प्रश्नाला फुलस्टॉप लागेल, असं वाटत होत पण तसं घडताना मात्र दिसत नाही. त्यानंतरही अजित पवार आणि राष्ट्रवादीबद्दल अनेक चर्चा पाहायला मिळत आहेत. त्यात आता पुन्हा संजय शिरसाठ यांनी नवा दावा केला आहे.

‘या’ मान्यवरांना मिळाला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, पाहा क्षणचित्रे

टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना बोलताना संजय शिरसाट म्हणाले, ” येत्या एक तारखेच्या मुंबईतील वज्रमुठ सभेत अजित पवारांची खुर्ची दिसणार नाही. अजित पवार लवकरच सरकारमध्ये सहभागी होणार आहेत.” ते पुढे म्हणाले की, “मला एकवेळ मंत्रिपदाची हाव असू शकते, पण अजित पवारांना मंत्रिपदाची हाव नाही.” एकंदरीत शिरसाठ यांच्या या नव्या दाव्यावर अजित पवार काय बोलणार हे देखील पाहावं लागणार आहे.

महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर आता नागपूर आणि महाराष्ट्र दिनी थेट राजधानी मुंबईमध्ये सभा घेतली जाणार आहे.

मुख्यमंत्री विसर्जित होणार, हे नक्की; आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवणार, सामनातून टोलेबाजी

छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित केलेल्या सभेला राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते सर्व नेते उपस्थित होते. 1 मेला महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची तिसरी सभा मुंबईत सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा बीकेसी मैदानात पार पडला होता. याच मैदानात महाविकास आघाडी शक्तीप्रदर्शन करणार आहे.

 

Tags

follow us