मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी सरकारविऱोधात अनेक टीक-टिपण्या आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातचं विरोधकांनी नाकाखालून आमचं सरकार काढून घेतलंय, त्यांनी नाकाखालून घेतलं का आणखी कशाखालून घेतलंय? तो संशोधनाचा भाग असल्याचा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
ते म्हणाले, एकीकडं उपमुख्यमंत्री सांगतात की, एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतला आहे तो निर्णय अंतर्गत आहे. तर दुसरीकडे ते म्हणतात की, आम्ही यांना फोन लावून बोलावून घेतलं बदला घेतला असं ते म्हणतात. या लोकांना महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासूनच वेदना होत होत्या.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर त्या दिवसापासून विरोधक कामाला लागले होते. विरोधकांनी आमचं सरकार नाकाखालून काढलंय. त्यामुळे आम्ही त्यांच्यात नाक खूपसत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, महाविकास आघाडीने काल मुंबईत विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना स्वतः चे सरकार टिकवता आले नाही. त्यांच्या नाकाखालून आम्ही सरकार घेऊन गेलो, अशी टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलंय.
शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल :
प्रकल्पाप्रश्नी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींसमोर आपली भूमिका मांडायला हवी होती. प्रकल्प गुजरातला पळवून गेले आहेत. यावर चर्चा झाली पाहिजे. भाजपच्या वाचालवीरांकडून अद्यापही वक्तव्ये थांबलेले नाहीत. राज्यातील शिक्षणसंस्थाचालकांचे करोडो रुपये थकले आहेत. अल्पसंख्यांक, आदिवासी, ओबीसी, विद्यार्थांची शिष्यवृत्ती सरकारने थकवल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय. 2024 मध्ये काय परिस्थिती असेल याबाबत मी सांगू शकत नाही कारण आम्ही काही ज्योतिषीकडे जाऊन ज्योतिषी करीत नाहीत. त्यांमुळे आमचं ज्योतिष काय असणार हे आम्हाला माहित नाही.
दरम्यान, पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे अजित पवार, शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे इतर नेते उपस्थित होते.