Download App

खासदाराऐवजी आमदार असते तर मंत्री झाले असते; अजितदादांनी सांगितली तटकरेंची खंत

मुंबई – राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर सुनिल तटकरेंना नक्कीच खंत वाटली असेल. आपण खासदाराऐवजी आमदार असतो तर मंत्री झालो असतो, असा मिश्किल टोला अजित पवार यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सुनिल तटकरेंना लागवला.

आपल्या सर्वांची बारकाईने माहिती ड्रायव्हरला असते. आपल्या घरातल्यांना देखील जी माहिती नसेत ती ड्रायव्हरला असते. सुनिल तटकरेंचे वडिल ज्यावेळी दौऱ्यावर असायचे त्यावेळी सुनिल तटकरे त्यांची गाडी चालवायचे. गाडी चालवताना त्यांचे कान वडिलांच्या बोलण्याकडे असायचे. यातूनच त्यांची जडणघडण झाली, असे अजित पवार म्हणाले.

रायगड जिल्हा असो की राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालय सुनिल तटकरेंच बारकाईने लक्ष असतं. दिल्लीत असले तरी त्याचं लक्ष राज्याच्या राजकारणात काय घडतं यावरच असतं. यातूनचं ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार झाले, असे अजित पवार म्हणाले.

खासदार सुनिल तटकरे हे महाराष्ट्र विधिमंडळात आमदार, मंत्री असताना त्यांनी केलेली काही भावस्पर्शी अभिनंदन व अभिवादनपर भाषणाचे केलेले संकलन पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले आहे. या प्रकाशन सोहळ्याला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ माजी उपध्यक्ष नरहरी झिरवळ, माजी भास्कर जाधव आदी मान्यवर उपस्थित असणार होते.

Tags

follow us