Download App

Kasba By Election : भाजपकडून कसब्यात पैशांचे वाटप; रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप…

  • Written By: Last Updated:

पुणे : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून पैशांचं वाटप करण्यात येत आहे. असा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. यासाठी धंगेकर उद्या शहर पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात धरणे आंदोलन करणार आहेत.

यासंदर्भात त्यांनी बोलताना सांगितले की, गेल्या 15 दिवसांपासून कसबा पोटनिवडणुकी प्रचार मोहीम सुरू आहे. यावेळी गेल्या दोन दिवसामध्या पोलिसांच्या उपस्थितीत भाजपचे नेते, सर्व पदाधिकारी, शिंदे सरकारचे सर्व मंत्री इथं येऊन लोकांना पैशांचं वाटप करत आहेत. तो लोकांच्या डोळ्या देखत ते लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून दमदाटी करण्यात येत आहे. या प्रकारच्या निषेधार्थ आम्ही कसबा गणपती समोर उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Kasba Bypoll : जिथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गल्ली बोळात फिरले!

कसबा आणि परिसरात भाजपचे लोक रात्रीच्या वेळी लोकांना भेटत आहेत. हजारो लोकांना पैशांचं वाटप सुरू आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही यासंदर्भात तक्रार केलेली आहे. पण निवडणूक आयोगही दबावा खाली काम करत आहे. तेही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

या प्रकारच्या निषेधार्थ आम्ही कसबा गणपती समोर उपोषणाला बसणार असल्याचं रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक पत्रक जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या काळामध्ये पुणे शहर पोलिस व निवडणूक आयोगाच्या दडपशाही विरुद्ध महविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे.

Tags

follow us