Allotment of bungalows : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सत्तेत सहभागी झाले. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आठवड्यानंतरही खाते वाटप झाले नसले तरी आता बंगले आणि दालनांचे वाटप करण्यात आले आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सिध्दगड हा बंगला मिळाला. तर दिलीप वळसे-पाटील यांनी सुवर्णगड आणि हसन मुश्रीफ यांना विशालगड बंगला मिळाला आहे. तर अदिती तटकरे यांना दालन मिळाले असले तरी त्यांना अद्याप बंगल्यांचे वाटप झाले नाही. (Allotment of bungalows to the newly appointed ministers)
https://www.youtube.com/watch?v=I2f9gQrbQD0
एकीकडे राज्यात सत्ताधारी तिन्ही पक्षामध्ये मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा आहे. असं असतांनाच पवार गटातील ज्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्या नवनियुक्त मंत्र्यांना आज सामान्य प्रशासन विभागाने शासन आदेश काढत बंगल्यांचे वाटप केले.नवनियुक्त मंत्र्यांपैकी कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला सरकारी निवासस्थान म्हणून मिळणार, याची अनेकांना उत्सुकता होती. आता ती उत्सुकता संपली आहे.
बंगल्याचे वाटप –
छगन भुजबळ – सिध्दगड
हसन मुश्रीफ – विशालगड
दिलीप वळसे-पाटील – सुवर्णगड
धनंजय मुंडे – प्रचितगड
धर्मरावबाबा आत्राम – सुरुचि-३
अनिल पाटील- सुरूचि- ८
संजय बनसोडे – सुरूचि – १८
दरम्यान, या यादित अदिती तटकरे यांचे नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अखेर शिवतारेंनी अजितदादांशी जुळवून घेतलं! तोंडभरुन कौतुक करत म्हणाले, ते तर माझे आवडीचे नेते…
दालन वाटप –
छगन भुजबळ – मंत्रालय मुख्य इमारत, दुसरा मजला, दालन क्रमांक २०१
दिलीप वळसे-पाटील – मंत्रालय मुख्य इमारत, तिसरा मजला, दालन क्रमांक – ३०३
हसन मुश्रीफ – मंत्रालय विस्तार इमारत, चौथा मजला, दालन क्रमांक – ४०७
धनंजय मुंडे – मंत्रालय व विस्तार इमारत, दुसरा मजला, दालन क्रमांक २०१ ते २०४, २१२
धर्मरावबाबा आत्राम – मंत्रालय विस्तार, सहावा मजला, दालन क्रमांक ६०१,६०२, ६०४
अनिल पाटील- मंत्रालय मुख्य इमारत, चौथा मजला – दालन क्रमांक – ४०१
संजय बनसोडे – मंत्रालय मुख्य इमारत, तिसरा मजला, दालन क्रमांक – ३०१
अदिती तटकरे – मंत्रालय मुख्य इमारत, पहिला मजला, दालन क्रमांक – १०३