Politics : वाडा-गढी हालत नसली, तरी त्यातली माणसं हालतात, निलंगेकरांनी देशमुखांना पुन्हा ललकारलं

लातूर : भाजप आमदार संभाजी पाटील-निलंगेकर (sambhaji patil nilangekar) यांच्या विधानामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. अमित देशमुख यांनी देशमुख गढी हालत नसल्याचं म्हटलंय. त्यावर पाटील-निलंगेकर यांनी देशमुखांना पुन्हा ललकारलंय. ते म्हणाले की, वाडा-गढी हालत नसली, तरी त्यातली माणसे हालतात. राज्याच्या राजकारणात अनेक गड-वाड्यातली माणसं हालून इतर पक्षात गेली आहेत. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात हे […]

Untitled Design (12)

Untitled Design (12)

लातूर : भाजप आमदार संभाजी पाटील-निलंगेकर (sambhaji patil nilangekar) यांच्या विधानामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. अमित देशमुख यांनी देशमुख गढी हालत नसल्याचं म्हटलंय. त्यावर पाटील-निलंगेकर यांनी देशमुखांना पुन्हा ललकारलंय. ते म्हणाले की, वाडा-गढी हालत नसली, तरी त्यातली माणसे हालतात. राज्याच्या राजकारणात अनेक गड-वाड्यातली माणसं हालून इतर पक्षात गेली आहेत. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात हे चित्र सर्वत्र पाहायला मिळालंय, असंही संभाजी पाटील-निलंगेकर यांनी म्हटलंय.
YouTube video player
अमित देशमुख फक्त कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करताहेत. त्यांनी असा संभ्रम निर्माण करू नये. एक तर उंबरठा ओलांडून अलीकडं यावं किंवा जिथं आहे तिथंच राहावं, असाही खोचक सल्ला संभाजी पाटील-निलंगेकर यांनी अमित देशमुखांना दिलाय.

आमदार अमित देशमुख (amit deshmukh) व त्यांचे भाऊ आमदार धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांच्या भाजप प्रवेशाबद्दलच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. त्याच्याबद्दल अमित देशमुखांनी आमचा वाडा मजबूत आहे, तो कधीच हलू शकतं नाही, भाजप (BJP)प्रवेशाच्या चर्चा निरर्थक असल्याचं स्पष्टीकरणही दिलं, मात्र विरोधक आणि देशमुखांमधील कलगीतुरा अद्यापही सुरुच आहे.

विधानसभेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या प्रचारात भाजप आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांनी देशमुखांना पुन्हा डिवचलंय आहे. निलंगेकर हे माध्यमांशी बोलत होते. काही दिवसापूर्वी सांगलीमध्ये एका कार्यक्रमात अमित देशमुख म्हणाले की, महापालिका निवडणुका कधी होतील? हे सुद्धा सांगता येत नाही, सध्या आपण अस्थिर परिस्थितीला तोंड देत आहोत. संजय काका पाटील भाजपात या म्हणताहेत, पण तुम्हीच स्वगृही परतावं असंही ते म्हणाले. लातूरचा देशमुख वाडा कितीही वादळं आली, कितीही वारे आले तरी तो तिथंच राहणार, असंही स्पष्टीकरण अमित देशमुख यांनी दिलं.

Exit mobile version