‘आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची आमची भूमिका…’; निवडणुकीतील पराभवानंतर दानवेंचं मोठं वक्तव्य…

ठाकरे गटाच्या बैठकीत स्वबळावर लढण्याचा विचार मांडला गेल्यामुळे महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता आहे.

Ambadas Danve

Ambadas Danve

Ambadas Danve : विधानसभा निवडणुकी (Vidhansabh Election) महायुतीनं (Mahayuti) दमदार कामगिरी केली. भाजपने (BJP) 132 जागा जिंकल्या, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अनुक्रमे 56 आणि 40 जागा जिंकल्या. त्यामुळं राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालं. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मिळालेल्या अपयशामुळे मविआतील घटक पक्षांकडून विचारमंथन बैठका सुरू आहेत. दरम्यान, ठाकरे गटाच्या बैठकीत येणाऱ्या निवडणुका मविआत न लढता स्वतंत्रपणे लढल्या पाहिजेत, असा सूर उमटला.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांची तलवार म्यान, भाजपचा मुख्यमंत्री होणार… 

ठाकरे गटातील गटाकडून विजयी आमदारांची आणि पराभूत झालेल्या उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांची बैठक उद्धव ठाकरेंनी बोलावली होती. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी काही वेगवेगळ्या भूमिका माडंल्या. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, यावर अंबादास दानवेंनी भाष्य केलं. दानवे म्हणाले की, बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या पाहिजे, असं मत मांडल्याचं दावने म्हणाले. निवडणूका आघाडीत न लढता स्वबळावर लढल्या पाहिजे, असा प्रकारचा सूर काही पदाधिकाऱ्यांचा होता, असं दानवेंनी सांगितलं.

भाजपने शिंदेंना पुन्हा CM करण्याचा शब्द दिला होता; शिवसेना नेत्याच्या दाव्याने मुख्यमंत्रिपदाचा पेच वाढला… 

दानवे म्हणाले, बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केलं. भलेही आमचे आमदार कमी निवडून आलेले असतील, शिवसेना एका आमदारावर देखील लढलेली आहे. वामनराव महाडिक असो की छगन भुजबळ, हे एकटे लढले होते. शिवसैनिक कसा असतो हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता तर आम्ही 20 आहोत. या 20 आमदारांनीही महाराष्ट्राच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी लढवा आणि काम करावं, अशा प्रकारचा निर्धार पक्षप्रमुखांच्या माध्यमातून व्यक्त झाला, असं दानवे म्हणाले.

पुढं ते म्हणाले, निवडणुकीतील झालेल्या पराभवानंतर काही भूमिका येत असतात. बैठकीत ईव्हीएमबाबत काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. आम्ही ईव्हीएमबाबत न्यायालयीन प्रक्रिया पार पाडणार आहोत. संघटनेविषयी काहींनी मत मांडल की, आपण यापुढ स्वतंत्र लढलं पाहिजे. शिवसेनेला सत्ता हवीय असं नाही. मात्र, पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याचा विचार मांडला. उद्धव ठाकरेंनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतलं, असं दानवे म्हणाले.

दरम्यान, ठाकरे गटाच्या बैठकीत स्वबळावर लढण्याचा विचार मांडला गेल्यामुळे आगामी महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वतंत्रपणे लढणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Exit mobile version