Ambadas Danve : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी विशेष तपास पथकाला (SIT)) मराठा आंदोलनातील हिंसक वक्तव्ये आणि हिंसक कारवायांची कसून चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपला (BJP) चांगलेच फटकारले आहे. मराठा आंदोलन वॉशिंग मशीनमध्ये शिरेना म्हणून त्याची चौकशी सुरू केली, असा खोचक टोला दानवेंनी लगावला.
Letsupp Exclusive : संभाजीराजेंचा पत्ता कट; कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती काँग्रेसचे उमेदवार
दानवे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना काही प्रश्न विचारले. तसेच प्रक्षोक भाषणांची चौकशी झाली होते, तसंच गोळ्या झाडणाऱ्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. तसेच त्यांनी काही प्रकरणांची यादीही देत जोरदार टीका केली. दानवेंनी लिहिलं की, एसआयटी नेमण्यासाठी अजून काही विषय! मराठा आंदोलन वॉशिंग मशीनमध्ये शिरेना म्हणून चौकशी सुरू केली, मग या खालील विषयांत पण चौकशी समिती नेमणार आहात? असा सवाल त्यांनी केला.
एसआयटी नेमण्यासाठी अजून काही विषय! मराठा आंदोलन वॉशिंग मशीनमध्ये शिरेना म्हणून चौकशी सुरू केली. मग या खालील विषयांत पण चौकशी समिती नेमणार आहात? प्रक्षोभक भाषणावर कारवाई होऊ मग गोळ्या झाडणाऱ्यांचीही चौकशी व्हायला हवी. #महाराष्ट्र #गुंडाराज #MaharashtraPolitics #SIT #Firing… pic.twitter.com/rhHTQkPawK
— Ambadas Danve (@iambadasdanve) February 28, 2024
Pune Drug Case मध्ये महत्त्वाची अपडेट; कुरकुंभ दिल्ली व्हाया लंडनला असं पोहचलं 140 किलो एमडी ड्रग्ज
गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांची एसआयटी चौकशी कधी होणार? रिंकी बक्सला प्रकरणात राहुल शेवाळेची एसआयटी चौकशी कधी होणार? पुण्यात सापडलेल्या चार हजार कोटींच्या ड्रग्जचा एसआयटी तपास कधी होणार? अंडरवर्ल्डशी संबंध असणाऱ्या बुकीची मुलीची गृहमंत्र्यांच्या घरात जाते, त्यांच्या पत्नीशी मैत्री करते, याचा एसआयटी तपास कधी होणार? जाहीर सभेत भास्कर जाधव यांच्या आईवरून शिव्या देणाऱ्या निलेश राणेंची आणि भास्कर जाधव यांना चोप देणार म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंची एसआयटी चौकशी कधी होणार?
तलाठी भरती घोटाळ्याची एसआयीटी चौकशी कधी करणार? अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीमाराचे आदेश कोणी दिले, याचा एसआयटी तपास कधी होणार? शिंदेंच्या शिवसेनेत पालघर जिल्हातील पदाधिकारी असणारा मुलगा एका मुलीला गाडी खाली चिरडून मारून टाकण्याचा प्रयत्न करतो त्याची एसआयटी चौकशी कधी होणार? वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला, त्याची एसआयटी चौकशी कधी होणार?बोला एक फुल्ल दोन हाफ या सर्व प्रकरणांच्या एसआयटी चौकश्या कधी होणार? असा सवाल दानवेंनी केला.