Download App

पाटलांचे वक्तव्यावर मिंधे गट काय बोलणार? की बोट चेपले.. दानवेंची टीका

Ambadas Danve’s criticism of Chandrakant Patil : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून आता राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. बाबरी मस्जिद पडली तेव्हा तिथे बाळासाहेब व शिवसैनिक नव्हते असा दावा पाटील यांनी केला होता. आता याच मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. तसेच यावेळी त्यांनी शिंदे गटाला सवाल करत त्यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर ठाकरे गट आक्रमक होत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.

नेमकं काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?
बाबरी मस्जिद पडली तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे म्हणाले याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब हे स्वतः तिथे गेले होते का शिवसैनिक तिथे गेले होते? मात्र त्याठिकाणी यापैकी कोणीही नव्हते असा खळबळजनक दावा पाटील यांनी केला होता. तसेच बाबरी ज्यांनी पाडली ते कदापी शिवसैनिक नव्हते. तसेच बाळासाहेबांनी तिथे आपले सरदार पाठवले होते का? असा सवाल करतच पाटील यांनी थेट ठाकरेंसह त्यांच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला होता.

पाटलांचे वक्तव्य त्याला दानवेंचा टोला
चंद्रकांत पाटील यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले होते. यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शाब्दिक टीका केली. दानवे ट्विटमध्ये म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे कर्तृत्व पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. सब कुछ ‘कमल’साठी हा आटापिटा आहे. मग ज्या संघटना बाबरी पतनात होत्या, त्या संघटनांच्या नेत्यांनी जबाबदारी घेण्याऐवजी बिळात शिरून बसणे का पसंत केले? यांना बाळासाहेब हवे आहेत, पण यांच्या आवश्यक तेवढेच…

चंद्रकांत पाटील यांच्यासारखे माणसं सरकारात असताच कामा नाहीत. मिंधे गट यावर आता काय बोलणार. की आता सगळे बोटं चेपले आहेत? सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं आम्हाला म्हणता, तुम्ही तर चक्क बाळासाहेब सोडले! जनता हिशेब करेलच..

आघाडीत बिघाडी ! राजीनामा देताना ठाकरेंनी सहकारी पक्षांना विचारात घेतले नाही, पवारांचे खळबळजनक वक्तव्य

तसेच पुढच्या ट्विटमध्ये दानवे म्हणाले, 1992 साली बालवाडीत शिकणारे आज सांगतात आम्ही कारसेवेत होतो. थोड्या दिवसाने भाजप हे पण सांगेल की आमचे संपूर्ण केंद्रीय आणि राज्यातील मंत्रिमंडळ पानिपतच्या लढाईत लढले होते. खोटेपणाची, अपमानित करण्याची हद्दच झाली. अशा शब्दात दानवे यांनी पाटील यांच्यावर हल्ला चढवला.

Tags

follow us