Download App

“फडणवीसांना वादळ रोखता येणार नाही, मला मुख्यमंत्री..”, शिंदेंनी अमित शाहांना काय सांगितलं, सामनातून खळबळजनक दावा

महाराष्ट्रात सध्या जे घडत आहे ते थांबवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हे वादळ रोखता येणार नाही

Amit Shah Eknath Shinde Meeting in Delhi : राज्यात सत्ताधारी महायुतीत सगळं काही ठीक नाही अशा बातम्या येत असतात. विरोधकांकडून सध्या हाच मु्द्दा वारंवार सांगितला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 जुलै (Eknath Shinde) रोजी अचानक दिल्लीला गेले होते. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू असताना शिंदे यांनी दिल्ली गाठण्याचं कारण काय? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. अमित शाह यांच्या (Amit Shah Eknath Shinde Meeting in Delhi) भेटीत नेमकी कोणती खलबते झाली याच्या खमंग चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

या भेटीची माहिती अद्याप समोर आली नसली तरी आज सामनाच्या रोखठोकमधून खळबळजनक दावा करण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्या जे घडत आहे ते थांबवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हे वादळ रोखता येणार नाही असे शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना म्हणाल्याचा दावा करण्यात आला आहे.

Eknath Shinde : पराभव ही सामुहिक जबाबदारी, एका निवडणुकीने सर्वकाही संपत नाही 

शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात काय घडलं?

मराठी एकजुटीच्या मेळाव्यानंतर राज्याच्या राजकारणाला विजेचे जोरदार धक्के बसले आहेत. त्याचे रुपांतर आता भूकंपाच्या जोरदार धक्क्यांत होईल आणि आपले राज्य पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल याची सर्वात जास्त भीती एकनाथ शिंदे आणि त्यांच्या जवळच्या लोकांना वाटत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे चिंताग्रस्त होऊन दिल्लीला गेले होते. गुरू अमित शाहांना भेटले. महाराष्ट्रात सध्या जे घडत आहे ते थांबवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे वादळ रोखता येणार नाही.

यावर अमित शाहांना विचारलं काय करायचं? त्यावर शिंदे म्हणाले, मी माझ्या लोकांसह भाजपात येतो. मला मुख्यमंत्री करा. हे सर्व रोखण्याची गॅरंटी देतो. शाह आणि शिंदे यांच्यात ही चर्चा झाली. अशी चर्चा झाल्याची चर्चा शिंदे गटात सुरू आहे असा दावा रोखठोक या सदरातून करण्यात आला आहे. दरम्यान, रोखठोकमधून करण्यात आलेल्या या दाव्यावर एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस, मला त्यांची दया येते…; संजय राऊतांचा टोला

follow us