हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस, मला त्यांची दया येते…; संजय राऊतांचा टोला

हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस, मला त्यांची दया येते…; संजय राऊतांचा टोला

Sanjay Raut : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला. या  व्हिडीओमध्ये ते सिगारेट ओढताना पाहायला मिळत आहेत. तसेच शिरसाट यांच्या बाजूला पैशांच्या नोटांची बंडलं ठेवलेली बॅग दिसत आहे. याच व्हिडिओवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका केली.

हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस, मला त्यांची दया येते…; संजय राऊतांचा टोला 

हा व्हिडिओ शेअर करत संजय राऊत यांनी ट्विटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. हा रोमांचक व्हिडिओ पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बघितला पाहिेज, असं राऊत म्हणाले. तसेच देशात हे काय चालले आहे? महाराष्ट्रातील एका मंत्र्यांचा हा व्हिडिओ अतिशय बोलका आहे, असंही राऊत म्हणाले.

Capture1

Capture1

मुख्यमंत्री फडणवीसांची मला दया येते…
संजय राऊत यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते! स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे ते फक्त पाहात बसणार आहेत? हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस, असा टोला राऊतांनी लगावला.

Capture

Capture

Sanjay Gaikwad : राऊतांवर टीका करता गायकवाडांची जीभ घसरली, म्हणाले, “संजय राऊतच्या..” 

दरम्यान, संजय राऊतांनी केलेल्या टीकेला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रत्युत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

शिरसाट काय म्हणाले?
शिरसाट म्हणाले, तो व्हिडिओ माझ्या बेडरूमधीलच आहे. मी प्रवासातून आल्यानंतर बेडवर बसलेला दिसतोय. तेथे माझे श्वानही आहे. प्रवासातून परतल्यानंतर माझी कपड्यांची बॅग लटकलेली दिसतेय, त्याची बातमी होते, याचं मला आश्चर्य वाटतं.

पुढं संजय शिरसाट म्हणाले, आमच्याकडे मातोश्री आणि मातोश्री २ नाही. माझे घर माझ्या मतदारसंघातील प्रत्येकासाठी खुलं असतं. कार्यकर्ते येतात, कोणीतरी उत्साहाच्या भरात व्हिडिओ काढला असेल.. माझ्या घरात चिठ्ठी देऊन कोणालाही बोलावलं जात नाही. काम काय, नाव काय, या गोष्टी विचारल्या जात नाहीत, असंही शिरसाट म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube