पराभवानंतर ब्लॅकमेलिंग सुरू केलं; संजय शिरसाट यांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप

पराभवानंतर ब्लॅकमेलिंग सुरू केलं; संजय शिरसाट यांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप

Imtiaz Jaleel blackmailing Sanjay Shirsat Allegation : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात संजय शिरसाट (Sanjay Shirsat) अन् इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यातील संघर्ष टोकाला गेलाय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सलग दोन पराभव झाला. त्यामुळे इम्तियाज जलील यांना काही काम राहिलं नाही. त्यामुळे त्यांनी ब्लॅकमेलिंग सुरू केलंय, असा गंभीर आरोप सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. इम्तियाज जलील यांच्या आरोपांना योग्य वेळी उत्तर उत्तर देणार असल्याचं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

पुरावे माध्यमांसमोर आणले

इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाटांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर बेकायदेशीर मालमत्ता खरेदी केली, असा आरोप केला होता. सरकारी वर्ग दोनची जमीन, शेंद्रा एमआयडीसीमध्ये आरक्षण बदलून खरेदी केलेला (Maharashtra Politics) भूखंड, शहराजवळील साहजापूर येथे पंधरा ते वीस एकर खरेदी केलेली जमीन, हॉटेल व्हिट्स खरेदीसाठी राजकीय दबाव आणत केलेले व्यवहार असे अनेक आरोप करत इम्तियाज जलील यांनी पुरावे माध्यमांसमोर आणले.

तुमची किडनी खराब होतेय? शरीर देते ‘असे’ संकेत, वेळीच ओळखा अन् सावध व्हा…

ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

सरकारी वर्ग 2 ची जमीन संजय शिरसाट यांनी दोन्ही मुले आणि पत्नीच्या नावाने खरेदी केली, असा आरोप करत इम्तियाज जलील यांनी ‘हरिजन’ शब्दाचा उल्लेख केला होता. यावरून आंबेडकरी संघटना संतप्त झाल्या होत्या. त्यांनी इम्तियाज यांच्या विरोधामध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती. तर दुसरीकडे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर इम्तियाज जलील अजून जास्त आक्रमक झाले. त्यांनी शिरसाट यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि सीबीआयकडे तक्रार केली होती.

इम्तियाज जलील जातिवाद करत आहे, असा आरोप करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय आणि अत्याचार कृती समितीने केलाय. त्यांनी उद्या 23 जून रोजी इम्तियाज जलील यांच्या अटकेसाठी, त्यांना हद्दपार करण्याच्या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केलंय. इम्तियाज जलील यांना बोलवता धनी दुसराच आहे, असं सांगत संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधला होता.

भारतातील टी20 वर्ल्डकपसाठी 13 टीम पात्र, आणखी 7 टीम बाकी; जाणून घ्या, प्रोसेस काय?

माझ्यातला पत्रकार जागा झालाय

कितीही दबाव आणला तरी मी आता घाबरणार नाही. आता माझ्यातला पत्रकार जागा झालाय. असं म्हणत इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाट यांना वारंवार आव्हान दिलं. तर आता शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर ब्लॅकमेलिंगचा आरोप केलाय. या संघर्षाचा शेवट कसा होतो? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube