Amit Shah on Sharad Pawar for corruption : निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवारांनी (Sharad Pawar) अनेक खोटे दावे केले. तसेच ते भ्रष्टाचारावर देखील ते बोलतात मात्र भारताच्या राजकारणातील सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा सरदार हे शरद पवार आहेत. असा जोरदार हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केला. ते आजच्या भाजपच्या पुण्यातील महाअधिवेशनात बोलत होते.
“डोकं धरून बसू नका, विधानसभेत कसर भरून काढा”; अमित शाहांचं कार्यकर्त्यांना टॉनिक
अमित शाह म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस सह सर्वच विरोधकांनी अनेक प्रकारचा अपप्रचार केला. ज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आरक्षण संपवणार असल्याचा खोटं नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं. त्यानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर आले आहेत त्यामुळे राज्यात शरद पवार देखील अशाच प्रकारे नवनवीन अपप्रचाराच्या कृपया समोर आणत आहेत.
नगरच्या जागेवर भाजपचा डोळा, आमदार जगताप म्हणाले, ‘यात गैर काय…’
त्यामुळे मी त्यांना हे सांगायला आलो आहे की, महाराष्ट्रातील राजकारण निवडणुकांना मी तिसऱ्या व्यक्ती म्हणून पहात असताना मी निरीक्षण नोंदवला आहे. की, जेव्हा जेव्हा राज्यात भाजपच सरकार आला आहे तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळाला आहे. तर जेव्हा जेव्हा शरद पवारांचे सरकार येतं तेव्हा आरक्षण गायब होतं. कारण 2014 ला भाजपचा सरकार आल्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत टिकणार आरक्षण मराठा समाजाला दिले गेले.
मात्र ते पुन्हा गायब झालं त्यानंतर आता पुन्हा शरद पवारांचे सरकार आलं तर मराठा आरक्षण गायब होईल. त्याचबरोबर पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, तसेच दूध पावडर आयात केल्याचा खोटा दावा निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवारांनी केला भ्रष्टाचारावर देखील ते बोलतात मात्र भारताच्या राजकारणातील सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा सरदार हे शरद पवार आहेत.