Download App

Amol Kolhe : जयंत पाटलांना भावी मुख्यमंत्री म्हणणारे कोल्हे म्हणाले, अजितदादा होते म्हणून…

Amol Kolhe On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे खासदार कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत आहेत. कधी ते नाराज असतात. कधी ते भाजपच्या जवळ जात आहेत का? असा प्रश्न पडत असतो. तर कधी ते एखाद वक्तव्य करतात. त्यांचं असंच एक वक्तव्य गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांचं मुख्यमंत्री पदाबाबतचं वक्तव्य चर्चेत आलं होतं.

राष्ट्रवादीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचं सर्वाधिक वेळा अर्थमंत्रीपद जयंत पाटील यांनी भूषवलं. त्यामुळं त्यांच्याकडे माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राचा सर्वांत आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाहतो. जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची आज राज्याला मुख्यमंत्री म्हणून अत्यंत गरज आहे, असं कोल्हे म्हणाले. ते सांगली दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात बोलले होते. कोल्हे यांनी जयंत पाटील यांचा उल्लेख भावी आदर्श मुख्यमंत्री केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमधे अजित पवार विरुद्ध जयंत पाटील यांच्यात सुप्त संघर्ष असल्याची चर्चा सुरू झाली होती.

Amol Kolhe : अमोल कोल्हे यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्री सांगितला….

मात्र त्यानंतर आता अमोल कोल्हेंनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न एका मुलाखतीमध्ये केला आहे. त्याचबरोबर त्यांनी अजित पवारांचं देखील तोंडभरून कौतुक केल्याचं यावेळी पाहायाला मिळालं. अमोल कोल्हे म्हणाले की, केवळ 22 दिवसांत मला खासदारकी उमेदवारी मिळाली आणि केवळ 22 दिवसांत माझा प्रचार होऊ शकला आणि मी विजयी झालो. हे होऊ शकल ते फक्त अजित पवारांमुळे. असं कोल्हे म्हणाले.

Amol Kolhe:…म्हणून ‘त्या’ चिमुकल्यांचे पाया पडले! भारावलेल्या अमोल कोल्हेंनी केलेली कृती चर्चेत

तर आपण सांगली दौऱ्यावर असताना जयंत पाटील आणि त्यांचे पुत्र यांपैकी कोणी लोकसभेत आणि काणी विधानसभेत असावं यावर प्रतिक पाटील यांनी लोकसभेत तर जयंत पाटील यांनी विधानसभेत राहावं कारण ते भावी मुख्यमंत्री होऊ शकतात असं आपम बोललो होतो. मात्र आपण मुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटील आणि अजित पवार यांची तुलना केली नव्हती. असं स्पष्टीकरण देखील यावेळी कोल्हे यांनी आपल्या वक्तव्यावर दिलं आहे.

Tags

follow us