Amol Kolhe : अमोल कोल्हे यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्री सांगितला….

Untitled Design   2023 04 27T085659.461

Jayant Patil will be the next Chief Minister from NCP : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपच्या (BJP) जवळीकरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण कमालीचे तापले आहे. मात्र, अजित पवारांनी bjp सोबत जाण्याच्या सगळ्या चर्चांना विराम दिला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलतांना मोठा दावा केला होता. आगामी 2024 च्या निवडणुकीनंतर माझी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. काल अजित पवारांच्या या वक्तव्यावर बोलतांना नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितलं की, सध्या कोणतीही निवडणूक नाही, त्यामुळं आत्ताच त्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा मविआतील ज्या पक्षाला सर्वांत जास्त जागा मिळतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असं सांगितलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रवादीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा भावी आदर्श मुख्यमंत्री असा उल्लेख अमोल कोल्हे यांनी केला. काल सांगली दौऱ्यावर असतांना एका ते एका कार्यक्रमात बोलत होते. कोल्हे यांनी जयंत पाटील यांचा उल्लेख भावी आदर्श मुख्यमंत्री केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमधे अजित पवार विरुद्ध जयंत पाटील यांच्यात सुप्त संघर्ष असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कोल्हे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याचं सर्वाधिक वेळ अर्थमंत्री पद जयंत पाटील यांनी भूषवलं. त्यामुळं त्यांच्याकडे माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राचा सर्वांत आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाहतो. जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची आज राज्याला मुख्यमंत्री म्हणून अत्यंत गरज आहे, असं कोल्हे मनाले.

Kisan sabha long march : मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर विखेंसह दोन मंत्री आंदोलकांना भेटणार, लाल वादळ थांबणार?

मागील काही दिवसापांसून अजित पवार यांच्याच नावाची चर्चा आहे. अजित पवार नॉट रिचेबल असतांना ते भाजपसोबत जाणार का? आणि मुख्यमंत्री होणार का? अशा चर्चांना उत आला होता. या चर्चेनंतर जित पवारांनी माध्यमांसमोर येत या चर्चेंच खंडन केलं. मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तरी अजूनही चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीत. त्यानंतर अजित पवार यांनी पुण्यात बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेस आताही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकू शकते. आगामी 2024 च्या निवडणुकीनंतर माझी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाचे बॅनर लागले आहेत. पुणे आणि पुण्याच्या बाहेर मुंबई, नागपूर अशा शहरात देखील पोस्टर झळकतायत.

दरम्यान, काल अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा उल्लेख बोलतांना भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांच्या परस्परविरोधी वक्तव्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube