Kisan sabha long march : मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर विखेंसह दोन मंत्री आंदोलकांना भेटणार, लाल वादळ थांबणार?

Kisan sabha long march : मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर विखेंसह दोन मंत्री आंदोलकांना भेटणार, लाल वादळ थांबणार?

Radhakrushn Vikhe Meet To Kisan sabha long march : सध्या शेतकऱ्यांना ( farmer ) विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळं ( Unseasonal rain ) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. गायरान जमिनीचा प्रश्न, दुग्ध धोरण या शेतकऱ्यांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका घेतली आहे.

सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी किसान सभेच्या (Kisan Sabha) पुढाकाराने मोर्चा काढण्यात आला आहे. विविध मागण्यांसाठी आज 26 एप्रिल ते 28 एप्रिल 2023 या काळात अकोले ते लोणी असा जबरदस्त राज्यव्यापी पायी मोर्चा ( march ) निघाला आहे. राज्यातील अनेक शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. हा मोर्चा तीन दिवस पायी चालून, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोर्चाचे रुपांतर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलन करून तीव्र देणार जाणार असल्याचा इशारा देखील किसान सभेनं दिला आहे.

या आंदोलनाची दखल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. या पार्श्वभुमीवर दुपारी एक वाजता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत बैठक होणार आहे. या भटीत आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा होणार आहे.

Akole Long March : मोर्चा थांबविण्यासाठी विखे पाटील मैदानात; मोर्चेकऱ्यांना केली ‘ही’ विनंती

या मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे. तर या मंत्र्यांच्या भेटीनंतर या आंदोलनाची दिशा ठरणार आहे. तर मंत्र्यांसोबतच्या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही तर लाँग मार्च सुरुच राहणार असल्याची माहिती डॉ. अजित नवलेंनी दिली आहे. त्यामुळे आता लाल वादळ थांबणार का? याकडे सर्वांच लक्ष लागल आहे.

दरम्यान किसान सभेच्‍या माध्‍यमातून करण्‍यात आलेल्‍या मागण्‍यांबाबत सरकारने शेतकऱ्यांच्‍या प्रतिनिधींशी प्रदीर्घ चर्चा केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्‍यांबाबत सरकार सकारात्‍मक आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्‍याचे आश्‍वासन त्‍यांना दि‍ले आहे. फार प्रतिष्‍ठेचा प्रश्‍न न करता हा मोर्चा स्‍थगित करावा, असे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले बुधवारी हा मोर्चा सुरू झाल्यानंतर केले होते.

तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यात उष्माघाताने अनेकांचे बळी गेले आहे. यामुळे अशाप्रकारच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सद्यस्थितीत अखिल भारतीय किसान सभेच्या (Kisan Sabha) अकोले ते लोणी पायी (Ahmednagar) मोर्चापासून परावृत्त करण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आला. मात्र, या आंदोलनाचे निमंत्रक डॉ. अजित नवले (Ajit Navale) यांनी सरकारकडेच बोटं दाखवले असून प्रशासनाची विनंती धुडकावली. त्यामुळे अकोले पोलिसांनी त्यांना फौजदारी संहितेच्या अधिकारांचा वापर करुन नोटीस बजावली. एखाद्याही आंदोलकास उष्माघाताचा त्रास झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube