Amol Mitkari : “विदर्भाच्या भूमीतून कमळाबाई हद्दपार…”, मिटकरीकडून अनोखं अभिनंदन

महाराष्ट्रात पाच जागांवर विधान परिषद निवडणूक पार पडली. यात ३ जागांवर महाविकास आघाडीने, एका जागेवर भाजपने तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे. अंतिम निकाल आल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करून अभिनंदन केलं आहे. मिटकरी यांनी धीरज लिंगाडे आणि सुधाकर आडबाले यांच्या विजयाची पोस्ट करत त्यावर विदर्भाच्या भूमीतून कमळाबाई हद्दपार करायला सुरुवात करणाऱ्या […]

Amol Mitkari

Amol Mitkari

महाराष्ट्रात पाच जागांवर विधान परिषद निवडणूक पार पडली. यात ३ जागांवर महाविकास आघाडीने, एका जागेवर भाजपने तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे. अंतिम निकाल आल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करून अभिनंदन केलं आहे.

मिटकरी यांनी धीरज लिंगाडे आणि सुधाकर आडबाले यांच्या विजयाची पोस्ट करत त्यावर विदर्भाच्या भूमीतून कमळाबाई हद्दपार करायला सुरुवात करणाऱ्या दोन्ही विजयी उमेदवारांचे जोरदार अभिनंदन.. असं कॅप्शन लिहलं आहे.

#पिक्चर अभी बाकी है

याच पोस्टमध्ये अमोल मिटकरी यांनी कॅप्शन मध्ये “पिक्चर अभी बाकी है” असं कॅप्शन लिहलं आहे. त्यामुळे अमोल मिटकरी यांनी ट्विटमधून भाजपला पुन्हा डिवचलं आहे.

दरम्यान मागील 31 तासांपासून सुरू असलेली अमरावती पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी अखेर पूर्ण झाली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे (Dhiraj Lingade) यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे रणजित पाटील (Ranjitpatil) यांना मात दिली आहे. धीरज लिंगाडे यांच्या विजयामुळे अमरावती विभागात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Exit mobile version