Omraj Nimbalkar Accident : ठाकरे गटाचे तडफदार नेते आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraj Nimbalkar)यांच्या अंगावर डम्पर घालण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओमराज निंबाळकर यांच्या गावालगतच ही घटना घडली आहे. सकाळी ७ वाजता ओमराजे हे मॉर्निंग वॉकसाठी गोवर्धनवाडी येथील आपल्या राहत्या घरापासून काही अंतरावरच गेले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर डंपर (Dumper) घालण्याची घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी डम्पर चालकाला (Dumper driver) ताब्यात घेतले असून पोलीस (Police) चालकाची कसून चौकशी करत आहेत. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (An attempt to put a damper on Omraj Nimbalkar, Omraje narrowly escaped)
https://www.youtube.com/watch?v=U-DO31oT2ys
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराज निंबाळकर हे नेहमीप्रमाणे सकाळी व्यायामासाठी बाहेर पडले होते. व्यायाम करून घरी परत येत असतांना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव डम्परचा आवाज त्यांना आला. त्यांनी पाठीमागे वळून पाहिले तर डम्पर मोठ्या वेगाने आपल्याचं दिशेने येत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. डावी बाजू सोडून डम्पर उजव्या बाजूने भरधाव वेगाने येत होता. मात्र प्रसंगावधान राखत ओमराजेंनी उडी घेतली. त्यामुळे ते या अपघातातून थोडक्यात बचावले.
Sanjay Raut : श्रीकांत शिंदेंचं नाव घेतल्यावर थुंकल्याच्या कृतीचं वाईट वाटलं?
घटनेनंतर पोलिसांनी डम्परचा पाठलाग करून चालकाला अटक केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ढोवी पोलिसात डंपरचालकाविरुद्ध कलम २७९, ३३६, १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डम्पर चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करताना हा प्रकार घडल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान, हा अपघात होता की घातपात करण्याचा प्रयत्न होता, याविषयी परिसरात तर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, मी सुखरूप आहे, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
2019 मध्ये ओमराजे निंबाळकर खासदार झाल्यानंतर आमदार कैलास पाटील यांच्या धाराशिव तालुक्यातील पाडोळी येथे प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता.