उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; राष्ट्रीय पातळीवर ओळखला जाणारा ठाकरेंचा प्रवक्ता शिंदेंच्या गोटात

Anand Dubey Joins Shinde Sena; ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Anand Dubey Joins Shinde Sena

Anand Dubey Joins Shinde Sena

Anand Dubey Joins Shinde Sena: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला आणखी एक राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. 16 ऑक्टोबर रोजी हा पक्षप्रवेश झाला. दुबेंना शिंदे गटात महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. पक्षप्रवेशानंतर दुबे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकारचे मोठे पाऊल, चौकशी आयोग अधिकृतपणे स्थापन

राहुल गांधी देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आनंद दुबे यांनी केला. देशहित हेच आपल्यासाठी सर्वोच्च असल्याचे सांगत, इंडिया आघाडीला सत्तेपासून दूर राहावे लागल्याने विरोधक वैफल्यग्रस्त झाले आहेत, असा दावा त्यांनी केला. तसेच देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाला सोडचिठ्ठी

आनंद दुबे यांनी पक्षप्रवेशाच्या दोन दिवस आधीच ठाकरे गटातील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पक्षाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.

टीसीएस प्रकरणानंतर निदा खानच्या वैवाहिक आयुष्यात नवा पेच; घटस्फोटाच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजेरी

पक्षाची सध्याची भूमिका आणि आपली वैचारिक भूमिका यांच्यात अंतर निर्माण झाल्याचे दुबे यांनी म्हटले होते. वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमध्ये पक्षाची भूमिका मांडताना अडचणी येत असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाकरे गटात काम करताना आपण प्रामाणिकपणे पक्षाची बाजू मांडली. मात्र, पक्षाच्या भूमिकेत बदल झाल्याचे जाणवत असल्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मतभेद?

आनंद दुबे यांनी ठाकरे गट सोडण्यामागे हिंदुत्व आणि सनातन धर्माच्या मुद्द्यांवरील वैचारिक मतभेद असल्याचे सांगितले होते. पक्षाची विचारधारा आणि सार्वजनिक व्यासपीठांवरील विधानांशी आपला मेळ बसत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. सीजेपीच्या आंदोलनासंदर्भातील पक्षाच्या भूमिकेवरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

राष्ट्रीय पातळीवर ठाकरे गटाची बाजू मांडणारा चेहरा

आनंद दुबे हे ठाकरे गटाचे प्रवक्ते म्हणून राष्ट्रीय स्तरावरील चर्चांमध्ये पक्षाची भूमिका मांडत होते. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरही ते पक्षाची बाजू मांडत असत. आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांची गणना केली जात होती. मुंबईतील हिंदी भाषिक राजकारणातही त्यांची ओळख होती.

मोठी बातमी; सतीश वाघोलेंकडे MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

त्यामुळे दुबे यांच्या पक्षांतराकडे केवळ एका प्रवक्त्याने पक्ष सोडल्याची घटना म्हणून नव्हे, तर ठाकरे गटाच्या राष्ट्रीय पातळीवरील भूमिकेवर परिणाम करू शकणारी घडामोड म्हणून पाहिले जात आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांना कोणती जबाबदारी मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version