Download App

मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख गंभीर जखमी; प्रचारावरून परतत असताना कारवर दगडफेक

राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. लोकशाहीचे धिंडवडे उडवले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय.

  • Written By: Last Updated:

Anil Deshmukh : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) प्रचार सांगता झाल्यानंतर एक मोठी घटना घडली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कारवर दगडफेक झाली. त्यात देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. काटोल विधानसभा मतदारसंघात त्यांचा मुलगा सलील देशमुख हा उमेदवार आहे. त्याचा प्रचार करून परत घरी जात असताना हा हल्ला झाला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. लोकशाहीचे धिंडवडे उडवले जात आहेत. याचे उदाहरण आज निवडणुकीच्या सांगता सभेवरून घरी परतताना राज्याचे माजी गृहमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातून समोर येत असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे यंदा निवडणूक लढवत नाहीत. त्यांच्या एेवजी मुलगा सलील देशमुख यांना तिकीट दिलेले आहे. मुलासाठी देशमुख हे जोरदार प्रचार करत आहे. सोमवारी सायंकाळी प्रचार संपल्यानंतर ते कारने घरी परतत होते. त्यावेळी जलाखेडा मार्गावरून जात असताना त्यांच्या कारवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. चालकाच्या बाजूला देशमुख हे बसलेले होते. दरवाजाची काच उघडी होती. त्यामुळे गाडीत दगड आला. त्यात देशमुख यांच्या तोंडाला दुखापत झाली. रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. ते त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.

दगडफेक करणारे भाजपचे कार्यकर्ते?

देशमुख यांच्यावर दगडफेक करणारे हे भाजपचे कार्यकर्ते होते, असा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. तर भाजपने हा आरोप फेटाळून लावला आहे. निवडणुकीसाठी देशमुख यांनी स्टंटबाजी केला असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.

follow us