Download App

…म्हणून अनिल देशमुखांचं मंत्रिमंडळातून नाव वगळलं; अजितदादांनी सांगितलं खरं

Ajit Pawar On Anil Deshmukh : अनिल देशमुखांवर भाजपने आरोप केले होतो, त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं तर विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल म्हणूनच मंत्रिमंडळाच्या यादीतून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं(Anil Deshmukh) नाव वगळण्यात आलं असल्याचा खरं कारण उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे. कर्जतमध्ये अजित पवार गटाचे विचार मंथन शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात संबोधित करताना अजित पवारांनी हा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

Menstrual Hygiene Rules : संसर्ग टाळण्यासाठी मासिक पाळीदरम्यान स्वच्छता कशी राखावी? LetsUpp Marathi

अजित पवार म्हणाले, “अनिल देशमुख माझ्याबरोबर सर्व बैठकांना उपस्थित होते. ‘मला मंत्रीमंडळात स्थान मिळालं पाहिजे,’ असं देशमुखांनी म्हटलं होतं. पण, भाजपाकडून सांगण्यात आलं की, आम्ही देशमुखांवर सभागृहात आरोप केले आहेत. लगेच मंत्रीमंडळात त्यांना स्थान दिलं, तर आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे अनिल देशमुखांना घेता येणार नाही. मग, मंत्रीपदाच्या यादीतून देशमुखांचं नाव वगळलं गेलं. त्यावर देशमुखांनी सांगितलं मला मंत्रीपद नाही तर मी तुमच्याबरोबर येणार नाही. ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे, असं अजित पवारांनी बोलताना स्पष्ट केलं आहे.

‘विरोधात कुणीतरी लढलंच पाहिजे..,’; ‘बारामती लढवणार’ म्हणणाऱ्या दादांना ताईंचं उत्तर

शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होत असल्याची घोषणा केली होती. शरद पवार यांच्या राजीनाम्याचा निर्णय कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच झाला होता. 1 मे रोजी मला शरद पवारांनी बोलवून सांगितलं आता सरकारमध्ये जा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. इतर कुणालाही माहिती नाही. घरातल्या फक्त चौघांना माहिती होतं. ते राजीनामा देणार होते. तशा प्रकारे त्यांनी राजीनामा दिला. 15 लोकांची कमिटी तिथेच जाहीर केली. त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा. मग सगळे आश्चर्यचकित झाले. तिथे वातावरण बदललं. ते घरी गेल्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

त्यानंतर आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक महिला व युवक पाहिजेत, त्यांनी तिथे आंदोलन करून मागणी करायची की राजीनामा परत घ्या. मला हे कळलंच नाही की का? राजीनामा द्यायचा नव्हता तर नाही म्हणायचं. मग हे रोज जाऊन आंदोलनाला बसायचे. ठराविकच टाळकी होती तिथे. जितेंद्र सोडला तर एकही आमदार नव्हता तिथे. आम्हालाही कळेना. मला एक सांगतायत, तिथे एक सांगत असल्याचा खळबळजनक दावा अजित पवारांनी केला आहे.

Tags

follow us