Download App

एक वर्षानंतर अनिल देशमुख यांची सुटका, ऑर्थर रोड जेलबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची आज कारागृहातून सुटका करण्यात आलीय. त्यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.

अनिल देशमुख यांच्या जामिनाला दिलेली स्थगिती वाढवण्याची सीबीआयची विनंती आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून देशमुख हे आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देशमुख आता कारागृहाबाहेर आले आहेत.

अनिल देशमुख यांचा जवळपास तब्बल 1 वर्ष 1 महिना 27 दिवसांनी सुटका करण्यात आलीय. त्यांच्या स्वागत करण्यासाठी कारागृहाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय.

मला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकलं होतं मात्र माझा न्यायदेवतेवर विश्वास असल्याची प्रतिक्रिया अनिल देखमुख यांनी दिलीय.

कथित आर्थिक प्रकरणात ईडीने 2 नोव्हेंबर 2021 रोजी अनिल देशमुख यांना अटक केली होती. त्यानंतर एप्रिल 2022 मध्ये सीबीआयने 100 कोटींच्या कथित खंडणी वसुली प्रकरणात देशमुख यांना ईडीकडून ताब्यात घेऊन अटक केली.

ईडीने दाखल केलेल्या गुह्यात देशमुख यांना 4 ऑक्टोबरला जामीन मंजूर झाला होता तर 12 डिसेंबर रोजी सीबीआयकडून दाखल गुह्यातही देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी जामीन मंजूर केला.

त्याचवेळी सीबीआयला सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी वेळ देत जामिनाच्या निर्णयाला दहा दिवसांची स्थगितीही दिली. दरम्यान, ऑर्थर रोड जेलबाहेर कार्यकर्त्यांसह राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील हजेरी लावली आहे.

Tags

follow us