Download App

SC च्या गाईडलाईन्स विरोधात निर्णय, नार्वेकरांकडून लोकशाहीची हत्या; अनिल परबांचे टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

Anil Parab : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (Mla Disqualification Case Verdict) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) यांनी निकाल दिला. त्यांच्या निकालामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला. नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचं म्हटलं. शिवाय शिंदे गटाचे भरत गोगवाले यांची प्रतोद म्हणून नियुक्तीही त्यांनी वैध ठरवली. दरम्यान, यावर आता ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी भाष्य केलं. विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा लोकशाहीची हत्या करणारा आहे, अशी टीका त्यांनी केली.

शरद मोहोळच्या हत्येची माहिती वकिलांना आधीच, पुणे पोलिसांचा धक्कादायक दावा 

आज एका वृत्तवाहीनीशी बोलतांना परब म्हणाले की, आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाने आम्हाला धक्का बसला नाही. मात्र, दिवसाढवळल्या लोकशाहीची हत्या झाल्यानं वाईट वाटलं. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना एक चौकट आखून दिली होती. गाईडलाईन्स दिल्या होत्या. मात्र, कोर्टाच्या गाईडलाईन्स डावलून घटनेला कायदा पायदळी तुटलल्या गेला. आता सुप्रीम कोर्ट मोठं की, ट्रिब्यूनल कोर्ट मोठं हे ठरवण्याची वेळ आली आहे. कारण, सुप्रीम कोर्टाला खाली दाखवून हा निर्णय दिला आहे. महाशक्तीचं पाठबळ असल्यानं हा निकाला विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे, असं परब म्हणाले.

Pune Metro : कासारवाडी रेल्वे स्टेशनवर स्पार्किंग ब्लास्ट, मेट्रोची एक मार्गिका बंद 

परब पुढं म्हणाले की, विधानसभेचा अध्यक्ष जेव्हा विधासनभा चालवत असतो, तेव्हा त्यांच्या कामात कोणीही ढवळाढवळ करू शकत नाही. सुप्रीम कोर्टाही त्यांना सल्ले देऊ शकत नाही. मात्र, या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रता प्रकरण सुनावणीसीठी दिलं होतं. नार्वेकर हे ट्रिब्युनल कोर्ट म्हणून काम करत होते. हे प्रकरण नार्वेकरांकडे सोपवतांना सर्वोच्च न्यायालयाने चौकट निश्चित केली होती. त्यातच विधानसभा अध्यक्षांना निकाल द्यावा लागणार होता. पण, विधानसभा अध्यक्षांनी ही चौकट मोडून निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने चौकट निश्चित केल्यामुळे आम्हाला न्यायाची अपेक्षा होती. मात्र, त्यांनी लोकशाहीची हत्या केली, अशी टीका परब यांनी केली.

राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाचे निकाल वाचल्याचा दावाही अनिल परब यांनी केला. निवडणूक आयोगाने आमच्याकडून जे काही मागितले होते ते आम्ही दिले आहे. त्यामुळे तरीही आमच्या विरोधात निकाल लागला तर ही लोकशाहीची सर्वात मोठी हत्या आहे, असे अनिल परब म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज