Anjali Damania criticized Ajit Pawar : लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच आता पक्षाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अजितदादा गटाने प्रत्येक जिल्हाध्यक्षाला चारचाकी गाडी देण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार गटाच्या या निर्णयाचे पडसाद राजकारणात उमटू लागले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. या गाड्यांसाठी येणारा पैसा सिंचन घोटाळ्यातील आहे का की अजित पवारांनी (Ajit Pawar) कष्ट करून कमावला आहे, असा सवाल दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे. त्यात त्यांनी अजित पवार गटाच्या या निर्णयाचा उल्लेख करत हल्लाबोल केला आहे. जो पक्ष अजून पक्ष म्हणून घोषित झाला नाही त्या पक्षाने इतक्या अफाट गाड्या कुठून घेतल्या. पैसा कुठून आला. कुणी देणग्या दिल्या. आता ईडी, एसीबी आणि ईसीने डोळे मिटून घेतले आहेत का असे सवाल त्यांनी विचारले. हे सगळे सिंचन घोटाळ्यातले पैसे आहेत ? का अजित पवारांनी काबाड कष्ट करून कमावलेले पैसे. कुठून येतात एवढाल्या गाड्या. सामान्य माणसाला एक गाडी घेताना देखील नाकीनऊ होते अशी दुसरी पोस्टही त्यांनी केली.