कर्जत बाजार समितीत रोहित पवार-राम शिंदेंना बरोबरीत जागा, आता फेर मतमोजणी

Apmc Election karjat : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात जोरदार चुरस होती. आमदार शिंदे यांनी एेनवेळी राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष फोडला. त्याला बाजार समितीच्या रिंगणात उतरविले होते. मतमोजणीमध्ये दोन्ही गटात काटे की टक्कर दिसून आली. दोन्ही गटाला बहुमत मिळालेले नाही. राम शिंदे […]

Shinde Karjat

Shinde Karjat

Apmc Election karjat : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात जोरदार चुरस होती. आमदार शिंदे यांनी एेनवेळी राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष फोडला. त्याला बाजार समितीच्या रिंगणात उतरविले होते. मतमोजणीमध्ये दोन्ही गटात काटे की टक्कर दिसून आली. दोन्ही गटाला बहुमत मिळालेले नाही. राम शिंदे गटाला व रोहित पवार गटाला प्रत्येक नऊ अशा समान जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर दोन जागांसाठी फेर मतमोजणी सुरू करण्यात आली आहे.

(बातमी अपडेट होत आहे)

Exit mobile version