Apmc election karjat: कर्जत बाजार समितीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या गटात जोरदार चुरस होती. ही चुरस मतमोजणीत दिसून आली. या बाजार समितीत १८ जागा आहेत. त्यातील प्रत्येकी नऊ जागा दोन्ही गटाला मिळाल्या आहेत. त्यामुळे जागा समसमान झाल्या आहेत. त्यामुळे आता सभापती कोणाचा होणार याची उत्सुकता आहे. यातील कोणाचे संचालक फुटतात की ईश्वर चिठ्ठीने सभापती होईल हे भविष्यात स्पष्ट होईल.
श्रीगोंद्यात Rahul Jagtap ‘किंग’; एकत्र आलेल्या पाचपुते-नागवडेंना धक्का !
राम शिंदे गटाच्या दोन जागा या थोड्या फरकाने पराभूत झाल्या. शिंदे यांच्या गटाकडून दोन जागांवर फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीही ही मागणी फेटाळून लावली आहे. या निवडणुकीत राम शिंदे यांनी महाविकास आघाडी फोडली होती. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर हे भाजपमध्ये आले. त्यांना बाजार समितीचे तिकीट देत निवडून आणण्यात आले आहे. या बाजार समितीत पूर्वी राम शिंदे गटाची सत्ता होती. संचालक मंडळाची मुदत संपल्याने प्रशासकाची नेमणूक झाली होती.
Dharashiv APMC Election : राणा पाटलांनी सत्ता राखली; 17 जागा जिंकत भाजप सुसाट
महाविकास आघाडीच्या काळात येथे प्रशासक आला होता. त्यावरून राम शिंदे यांनी रोहित पवारांवर आरोप केले होते. या निवडणुकीत रोहित पवारांनी शिंदे यांचे बहुमत रोखले. शिवाय नऊ जागा जिंकून आपले लोक या बाजार समितीत बसविले आहे. त्यामुळे काही प्रमाणात राम शिंदे यांना हा झटका आहे. क्रॉस वोटिंगचा मोठा फटका राम शिंदे यांच्या पॅनलला बसला. यामुळे हा पॅनल बहुमतापासून दूर राहिला.
या निवडणुकीत आमदार प्रा.राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. या निवडणुकीत आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठीशी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, जिल्हा बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, भाजप नेते प्रविण घुले, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष बळीराम यादव सह आदी नेते एकवटले होते. या सर्वांनी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून मोठी आघाडी घेतली होती. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलने सोसायटी मतदारसंघातील सर्वाधिक 7 जागांवर विजय मिळवला. आमदार रोहित पवार यांच्या पॅनलला ग्रामपंचायत मतदारसंघाने साथ दिली.