श्रीगोंद्यात Rahul Jagtap ‘किंग’; एकत्र आलेल्या पाचपुते-नागवडेंना धक्का !

  • Written By: Published:
श्रीगोंद्यात Rahul Jagtap ‘किंग’; एकत्र आलेल्या पाचपुते-नागवडेंना धक्का !

APMC Election Shrigonda : नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा बाजार समितीमध्ये वेगळे राजकीय समीकरण पहायला मिळाले. राज्यात महाविकास आघाडी एकत्र लढत असताना श्रीगोंद्यात मात्र भाजप आमदार बबनराव पाचपुते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे हे एकत्र आले होते. तालुक्यातील दोन मोठे नेते एकत्र आल्यानंतरही त्यांच्या पॅनेलला पराभवाचा झटका बसला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल जगताप यांनी बाजार समितीमध्ये एकहाती सत्ता आणली आहे. राहुल जगताप यांच्या मंडळाला 11 जागा मिळाल्या आहेत. पाचपुते-नागवडे पॅनलला सात जागाच जिंकता आल्या आहेत. या बाजार समितीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची म्हणजेच नागवडे-जगताप गटाची सत्ता होती. जगताप यांना शह देण्यासाठी राजेंद्र नागवडे व आमदार बबनराव पाचपुते यांच्यात आघाडी झाली होती. राहुल जगताप यांच्याविरोधात दोघांनी जोरदार प्रचार केला होता.

प्रताप ढाकणेंच्या ताब्यातील बाजार समिती राजळेंनी हिसकावली !

या बाजार समितीसाठी 98 टक्के मतदान झाले होते. आज झालेल्या मतमोजणीत मात्र मतदारांनी नागवडे-पाचपुते यांच्या गटाला जोरदार धक्का दिला आहे. राहुल जगताप यांनी बाळासाहेब नाहाटा, घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार यांना एकत्र करत गट केला होता. जगताप यांची सत्ता आली असली तरी त्यांच्या गटातील बाळासाहेब नाहाटा यांच्या मुलाला पराभवाचा सामना करावा लागला. मितेश नाहाटा हे पराभूत झाले.

APMC Election : बारामतीमध्ये एकहाती सत्ता; विजयानंतर अजित दादा म्हणाले…

आमदार बबनराव पाचपुतेंना पुतण्याने आणले जेरीस
काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी बंडखोरी केली होती. साजन पातपुते हे काष्टीचे सरपंच झाले. आता बाजार समिती निवडणुकीत ते थेट राहुल जगताप यांना जाऊन मिळाले. साजन पाचपुते हे बाजार समितीच्या निवडणुकीत उभे राहिले आणि निवडूनही आले आहेत. पुतण्याने आमदार पाचपुते यांना राजकारणात जेरीस आणल्याचे बोलले जात आहे.

बाजार समितीतील विजयी उमेदवारः  रोहिदास पवार, दत्तात्रय पानसरे-बापूसाहेब जगताप -अजित जामदार – नितीन डुबल -दीपक भोसले -भास्कर वागस्कर -अतुल लोखंडे -दत्तात्रय गावडे – महेश दरेकर, साजन पाचपुते- प्रशांत ओगले – लक्ष्मण नलगे- लौकिक मेहता- आदिक वांगणे -मनिषा रोडे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube