‘ज्ञानेश कुमार नव्हे, त्यांच्या बॉसच्या राजीनाम्याची मागणी करा’; अरविंद केजरीवालांचा कॉक्रोच जनता पार्टीला सल्ला

Arvind Kejriwal Urges CJP ; कॉक्रोच जनता पार्टीने ज्ञानेश कुमारांऐवजी त्यांच्या बॉसचा राजीनामा मागितला पाहीजे, असे केजरीवाल म्हणाले.

Arvind Kejriwal Urges CJP to Demand PM Modi’s Resignation Instead of Gyanesh Kumar’s

Arvind Kejriwal Urges CJP to Demand PM Modi’s Resignation Instead of Gyanesh Kumar’s

Arvind Kejriwal Urges CJP to Demand PM Modi’s Resignation Instead of Gyanesh Kumar’s: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्या कार्यपद्धतीवर आणि मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेवर (SIR) गंभीर आक्षेप घेत कॉक्रोच जनता पार्टी (CJP) येत्या 2 ऑक्टोबरला मुंबईत आंदोलनाची घोषणा केली होती. यात ते ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक भाष्य केलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीने ज्ञानेश कुमारांऐवजी त्यांच्या बॉसचा राजीनामा मागितला पाहीजे, असे केजरीवाल म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून त्यांनी CJP ला हा सल्ला दिला.

राज ठाकरे अन् राहुल गांधींचा पडद्याआड संवाद…प्रत्युत्तरामध्ये राऊतांची उडी; ठाकरेंचंही ‘हम्म’ उत्तर, सगळेच हसले!

“तुम्ही आधी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहात. मात्र, आता मध्यस्थांच्या राजीनाम्याऐवजी थेट त्यांच्या ‘बॉस’च्या राजीनाम्याची मागणी करा, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगात जे काही घडत आहे, ते ज्ञानेश कुमार स्वतःसाठी नव्हे, तर आपल्या बॉससाठी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे देशातील खरी चळवळ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्यासाठी उभी राहिली पाहिजे, असं आवाहन केजरीवाल यांनी केलं.

‘भाजपला फायदा होईल असे निर्णय घेता, 4 तारखेला दाखवून देऊ’; संजय राऊत ज्ञानेश कुमारांवर भडकले

दरम्यान, CJPच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यामुळे या मुद्द्याला आणखी राजकीय वळण मिळालं आहे. CJPकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असताना, केजरीवाल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबरच्या प्रस्तावित आंदोलनात CJPची भूमिका आणि त्यावरून होणारी राजकीय प्रतिक्रिया याकडे आता लक्ष लागलं आहे.

Exit mobile version