Download App

भाजप हा शेतकरी विरोधी पक्ष, ‘शासन तुमच्या दारी’ला गर्दी जमवण्यासाठी कर्मचाऱ्यांवर सक्ती; ठाकरे गटाची टीका

  • Written By: Last Updated:

Arvind Sawant On BJP : देशातील वाढत्या शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, खाजगीकरण, कंत्राटीकरण हे प्रश्न तीव्र झाले आहेत. विरोधक सातत्याने या मुद्दांवरून सरकारवर टीका करत आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant)यांनीही केंद्र सरकार आणि राज्य सरकावर जोरदार निशाणा साधला. भाजप (BJP) हा शेतकरी विरोधी पक्ष असल्याची टीका त्यांनी केली.

Sambhaji Raje Call to Manoj Jarange : ‘तुम्ही पाणी तरी प्या…’; संभाजीराजेंची जरांगे पाटलांना पुन्हा विनंती 

आज माध्यमांशी बोलतांना सावंत म्हणाले की, देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ह्या गेल्या दहा वर्षात झाल्या आहेत. राज्यातही शेतकरी आत्महत्या वाढल्या आहे. गेल्या वर्षात एकट्या यवतमाळमध्ये २९१ आत्हमत्या झाल्या तर यंदा २३० आत्महत्या झाल्यात. भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे. मागील दहा वर्षात मोदी सरकारने शेतकरी हितासाठी कुठलेही चांगले निर्णय घेतली नाहीत. त्यांनी फक्त शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे कृषी कायदे आणले होते. हा भाजला लागलेला कलंक आहे, अशी टीका सावंत यांनी केली.

ते म्हणाले, भाजपने तीन कृषी कायदे आणले होते. त्याला शेतकऱ्यांनी मोठा विरोध केला. शेतकऱ्यांच्या रोषामुळं त्यांनी तीन कायदे मागे घ्यावे लागले होते. बहुमताने पारित केलेले कायदे मागे घेतांना मोदींना शेतकऱ्यांची माफी मागावी लागली होती, असं सावंत म्हणाले.

पिकांना भाव नाहीत. सोयाबीनाल चांगला दर नाही. ठाकरे सरकारच्या काळात कापसाला १४ हजार रुपयाचा भाव मिळाला होताच. मात्र, यंदा साडेसाद हजार क्विंटल कापसाचे दर आहेत. देशात कापसांचं उत्पादन झालं असतांना कापूस आयात होतोय, हे भाजपचं शेतकरी विरोधी धोरण आहे. देशाचे पतंप्रधान शेतकऱ्यांचं उत्पपन्न दुप्पट होईल, अशी खोटी आश्वासनं देत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

यावेळी बोलतांना सावंत यांनी कंत्राटीकरण-खाजगीकरण यावरूनही सरकारवर टीकास्त्र डागलं. देशात आज मोठ्या प्रमाणावर कंत्राटीकरण सुरू आहे. शाश्‍वताकडून अश्‍वाश्‍वताकडे वाटचाल सुरू आहे. यात सामान्य माणूस भरडल्या जात असून त्याच्याशी सरकारला कर्तव्य नाही, अशी टीका त्यांनी केली.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात उत्तम काम करून लाखो लोकांचे जीव वाचविले. त्यांचा गौरव जागतिक स्तरावर झाला. सुप्रीम कोर्टानेही त्यांचं कौतूक केलं. ते खऱ्या अर्थाने राज्याचे कुटुंबप्रमुख झाले. जनता आजही त्यांना कुटुंबप्रमुख मानते. जनता आशेने त्यांच्याकडे पाहते. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या दारी जात नाही. तीन-तीन वेळा शासन आपल्या दारी कार्यक्रम रद्द केला जातो. ही निव्वळ जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका केली.

तुम्ही दरवाजात येत असाल तर दिलासा द्या, नाहीतर अन्यथा तमाशा थांबवा. शासकीय कार्यक्रमांना गर्दी जमवण्यासाठी कर्मचाऱ्यांवर सक्ती केली जाते, असंही सावंत म्हणाले.

Tags

follow us