Maharashtra Politics : ‘मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न विचारताच, शहाजी बापूंचा मोठं विधान

सांगोला : सध्या देशात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाची गरज आहे. ते सक्षमपणे नेतृत्व करत आहेत. मात्र भविष्यात निश्चित पंतप्रधान पदाच्या खुर्चीला न्याय देण्याची क्षमता नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यामध्ये आहे, असं मोठं विधान शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी केलं आहे. शहाजी बापू यांच्या या वक्तव्यामुळे अनेक राजकीय वर्तुळात […]

Untitled Design (25)

Shahaji Bapu Patil

सांगोला : सध्या देशात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाची गरज आहे. ते सक्षमपणे नेतृत्व करत आहेत. मात्र भविष्यात निश्चित पंतप्रधान पदाच्या खुर्चीला न्याय देण्याची क्षमता नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यामध्ये आहे, असं मोठं विधान शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी केलं आहे. शहाजी बापू यांच्या या वक्तव्यामुळे अनेक राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. वंचित आणि शिवसेनेच्या युतीमुळे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमध्ये तणाव निर्माण झाल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला.

सी व्होटरचा सर्व्हे आला आहे. त्यामध्ये भाजप विरोधात जनमत असल्याचं सांगितलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हेच परत सांगितलं. त्यावर शहाजी बापू पाटील यांनी आपले मत व्यक्त केलं. भाजपा विरोधात जनमत आहे, हे शरद पवार (Sharad Pawar) साहेबांचं मत व्यक्तिश: आपणास मान्य नाही. भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या कारभाराविषयी जनता समाधान व सुखी आहे, असा दावा शहाजी बापू पाटील यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्रंदिवस जनतेसाठी कष्ट करत आहेत. यामुळे शिंदे गटाला वंचित आणि शिवसेनेच्या युतीचा कोणताही फटका बसणार नाही. आजपर्यंत सर्व सर्व्हे चुकीचे ठरले आहेत. यामुळे लोकसभेत शिंदे आणि फडणवीस यांच्या उमेदवारांना चांगले बहुमत मिळणार असल्याचा, असा दावा त्यांनी केला.

अचानकपणे सत्ता गेल्याने महाविकास आघाडीत सर्वच पक्षांना तत्त्व सोडून अनेकांशी युती करावी लागत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. आगामी निवडणुका कशा लढवाव्यात याकरिता ते प्रयत्न करत आहेत. ही त्यांची केविलवाणी धडपड आहे, अशी टीका त्यांनी केली.

वंचित आणि शिवसेनेत युतीमुळे महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव निर्माण झाला आहे, असा दावाही त्यांनी केला. शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दखल घेण्यात आली. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्या मतदारसंघाची लोकसेवा आयोगाच्या सराव परीक्षेत दखल घेतली जाते याचा मला सार्थ अभिमान वाटतो. राजकारणात वारस हा विचारांचा ठरत असतो. एकनाथ शिंदे हे राजकीय आणि वैचारिक दृष्ट्याच बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत. हे महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारले आहे. यामुळे बाळासाहेबांचे तैलचित्र सभागृहात लावून वारसदार होत नाही, हे संजय राऊत यांचे मत चुकीचे असल्याचा पलटवार त्यांनी केला.

Exit mobile version