गेल्या काही दिवसापासून आपल्याच पक्षावर आणि पक्षाच्या नेत्यांवर टीका केल्यामुळे काँग्रेस नेते आशिष देशमुख चर्चेत आहेत. आज पुन्हा एकदा देशमुख चर्चेत आले. कारण काँग्रेसच्या देशमुख यांनी आज सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.
यावेळी भेटीनंतर आशिष देशमुख यांनी पत्रकारांची संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की “चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असले तरी आमचे अतिशय जीवलग मित्रही आहेत. ते विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेत आहेत. त्याअनुषंगाने आमचे काही कामं नक्कीच असतात. शिवाय नाश्त्याला बोलावलं असल्याने नाही म्हणता येत नाही.”
“राजकारणात पण काही कुस्त्या चालल्या आहेत” व्हिडीओ शेअर करत फडणवीसांचा इशारा कोणाला?
यावेळी बोलताना त्यांनी आशिष देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचं कौतुक केलं. ते म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे हे माझ्याबरोबर आमदार होते, मंत्री होते. ते त्यावेळचे आमचे अतिशय उर्जावान उर्जामंत्री होते. याशिवाय पालकमंत्री म्हणून त्यांनी नागपूरसाठी जे काम केलं ते नक्कीच उल्लेखनीय होतं.
आशिष देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचं कौतुक केल्यामुळे देशमुख पुन्हा भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी याचा राजकीय अर्थ काढू नये असं म्हटलं आहे.
“…तर राहतील त्यांना सोबत घेऊन लढणार” पवारांच्या ‘त्या’ वाक्यांवर नाना पटोलेंकडून उत्तर
नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून एक खोका दिला जातोयं. मुख्यमंत्री शिंदे लवकरच गुवाहाटीला असतील, एकनाथ शिंदेंकडून नाना पटोले यांना एक खोका दिला जातोय, असा दावा आशिष देशमुख यांनी होता. त्यानंतर काँग्रेसच्या मुंबईत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत शिस्तपालन समितीकडून आशिष देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून येत्या तीन दिवसांत त्यांना काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने उत्तर मागितलं असल्याचं समोर आलंय. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आशिष देशमुख यांच्यावर पक्ष कारवाई करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आज अखेर काँग्रेसच्या बैठकीत देशमुख यांचं उत्तर येईपर्यंत त्यांचं ते काँग्रेस पक्षातून निलंबित असणार आहेत.
ठाकरे की शिंदे धनुष्यबाण कोणाचा? चिन्हासंदर्भातील आजची सुनावणी रद्द