“…तर राहतील त्यांना सोबत घेऊन लढणार” पवारांच्या ‘त्या’ वाक्यांवर नाना पटोलेंकडून उत्तर

  • Written By: Published:
“…तर राहतील त्यांना सोबत घेऊन लढणार” पवारांच्या ‘त्या’ वाक्यांवर नाना पटोलेंकडून उत्तर

“आज देशात संविधान धोक्यात आलं आहे, महागाई आणि गरिबीमुळे देश संकटात आहे. त्यामुळे जे आमच्यासोबत आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन भाजपविरोधात लढणार आहे.” असं उत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांना दिले आहे. काल शरद पवारांनी (Sharad Pawar) 2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे की, नाही, हे आत्ताच कसं सांगणार? असं वक्तव्य केलं होतं.

त्यामुळं महाविकास आघाडीच्या पुढील निवडणुकांमध्ये एकत्र लढण्यामध्ये संभ्रमतेंच आणि साशंकता निर्माण झाली. दरम्यान त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे. यावर नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसची भूमीका स्पष्ट आहे. जो पक्ष भाजप विरोधात आहे त्यांना सोबत घेऊन आम्ही लढणार आहे. जे आमच्यासोबत आहे त्यांचे विचार वेगळे असू शकतात. आज देशात संविधान धोक्यात आलं आहे, महागाई आणि गरिबीमुळे देश संकटात आहे. त्यामुळे जे आमच्यासोबत आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन भाजपविरोधात लढणार आहे.

Sanjay Raut : आम्ही जी नशा करतो, ती तुम्हाला पराभूत करण्याची नशा; तुम्ही द्वेषाची भांग पिऊन बोलता

दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. यावर बोलताना राऊत म्हणाले की अनेकदा पवारांच्या बोलण्याचा, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. आत्ता या क्षणी महाविकास आघाडी अत्यंत मजूत आहे. मविआच्या एकत्र सभा आम्ही कशासाठी घेत आहोत… तर आम्ही अद्याप एकत्र आहोत हे लोकांना सांगण्यासाठी. 1 मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची ऐतिहासिक सभा होणार आहे. त्या सभेला महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते हजर राहतील, असं राऊत म्हणाले.

ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या उभारणीत शरद पवारांचा मोठा वाटा आहे. आम्ही सगळे आहोतच. उद्धव ठाकरे, राहुल गांधी आहेतच. पण शरद पवारांचं महत्व यात फार आहे. ते महत्व कायम राहणार आहे. त्यांची भूमिका आहे की, महाविकास आघातील तीनही पक्ष एकत्र राहिले, तर 2024 च्या निवडणुकीत आपण भाजपचा पराभव करू शकू, लोकसभेतही भाजपला धोबीपछाड करू.

“राजकारणात पण काही कुस्त्या चालल्या आहेत” व्हिडीओ शेअर करत फडणवीसांचा इशारा कोणाला?

त्यामुळं महाविकास आघाडीच्या संदर्भात पवारांची एकत्र न लढण्याची भूमिका असेल, असं मला वाटतं नाही. आम्ही सगळेच सातत्याने त्यांचाशी चर्चा करत असतो. आत्ताही मी त्यांच्याशी बोललो. त्यांच्या बोलण्यावरून महाविकास आघाडी तुटावी, असं मला वाटत नाही, असं राऊतांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube