मुंबई : “स्वत:चं सरकार टिकवण्यात, स्वत:चे मंत्री एकत्र ठेवण्यात ज्यांना अपयश आलं, त्या उद्धव ठाकरेंनी आयुष्यात केवळ वैचारिक स्वैराचार केला. त्यांनी भाजपाला टोमणे आणि उदाहरणं देण्याची आवश्यकताच नाही.” अशी टीका भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते बोलत होते.
“ज्यांनी आयुष्यभर वैचारिक स्वैराचार केला, अशा उद्धव ठाकरेंना भाजपावर बोलण्याचा अधिकारच नाही. आधुनिक महाराष्ट्रात किंबहुना ९० च्या दशकानंतर ज्यांच्या वैचारिक स्वैराचाराचे उदाहरण कु पद्धतीने दिले जाईल, असा राजकीय व्यवहार म्हणजे उद्धव ठाकरेंचे राजकारण होय. त्यांनी भाजपाला शिकवण्याची गरज नाही.”
ज्या उध्दवजी ठाकरे यांनी आयुष्यभर वैचारिक स्वैराचार केला, अशा उद्धवजींना भाजपावर बोलण्याचा अधिकारच नाही. किंबहुना ९० च्या दशकानंतर ज्यांच्या वैचारिक स्वैराचाराचे उदाहरण कु पद्धतीने दिले जाईल, असा राजकीय व्यवहार म्हणजे उद्धवजींचे राजकारण होय. त्यांनी भाजपाला शिकवू नये. @OfficeofUT pic.twitter.com/fk0LnrfTxC
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 23, 2023
ते पुढे म्हणाले की “मला सर्व गोष्टी मांडायच्या नाहीत, स्वत:च्या आयुष्यात, स्वत:च्या कुटुंबात, स्वत:च्या पक्षात आणि स्वत:च्या सरकारमध्ये ज्यांना सलग अपयश आलं. कुटुंबात सुद्धा एक कुटुंब टिकवण्यात उद्धव ठाकरेंना अपयश आलं. पक्षातील नेते सोडून गेले, त्यांना एकत्र ठेवण्यात अपयश आलं. स्वत:चं सरकार टिकवण्यात, स्वत:चे मंत्री एकत्र ठेवण्यात ज्यांना अपयश आलं, त्या उद्धव ठाकरेंनी आयुष्यात केवळ वैचारिक स्वैराचार केला. त्यांनी भाजपाला टोमणे आणि उदाहरणं देण्याची आवश्यकताच नाही”
दरम्यान काल बोलताना “पंतप्रधान नरेंद्र मोदी असले, तरी महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय भाजपला मते मिळू शकत नाहीत, हे मोदींनाही मान्य करावे लागले आहे,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुंबईत केली होती.