चिंचवड : पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदार संघामध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकालाचीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत आहे. निकालाचा चौथा कल हाती आला आहे. चिंचवडमध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. तर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार काटे यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आणि काँग्रेसचे नाना काटे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. सध्या चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर आहे तर नाना काटे आणि रागुल कलाटे पिछाडीवर आहे. मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीत अश्विनी जगताप १६,५२२ मतांनी आघाडीवर आहेत. तर नाना काटे १३, ५७४ मतांना पिछाडीवर आहेत. राहुल कलाटे ५००० मतांनी पिछाडीवर आहेत.
https://www.youtube.com/watch?v=X1zSKzw9xnQ
निकालापूर्वी चिंचवड उमेदवार अश्विनी जगताप यांनी सूचक वक्तव्य केलं आहे, ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. लक्ष्मण जगताप यांनी तेवढा विकास केला आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे ही निवडणूक लागली. इतक्या लवकर निवडणूक लागेल असं वाटलं नव्हतं. विरोधकांनी फॉर्म भरल्यामुळे आमच्या सगळ्यांवर भार पडायला लागला. बिनविरोध झाली असती निवडणूक तर चांगलं झालं असतं, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक तर्क वितर्क काढण्यात येत आहे. लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर लगेच निवणुका लागल्याने त्या नाराज असल्याचे बोलले जात आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांची आघाडी
दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेना आणि भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच पोटनिवडणुक आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. त्यामुळे आज मतपेट्यांमधून कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
बातमी अपडेट होत आहे.