आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं आखली रणनीती, संपर्कप्रमुखांच्या केल्या नियुक्त्या

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं आखली रणनीती, संपर्कप्रमुखांच्या केल्या नियुक्त्या

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिल्यानंतर आता शिंदे गट चांगलाच अॅक्शन मोडवर आला आहे. उध्दव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटाला समर्थन देणार्‍या खासदार-आमदारांना आता मुख्यमंत्री शिंदेकडून नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य‍ नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार लोकसभा संपर्कप्रमुखांच्या लोकसभा संपर्कप्रमुखांच्या या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

https://www.youtube.com/watch?v=X1zSKzw9xnQ

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या नियुक्त्या केल्या. यात तब्बल २८ शिलेदारांची निवड करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खा. प्रतापराव जाधव, खा. भावनाताई गवळी, खा. कृपाल तुमाने, खा. श्रीरंग बारणे, खा. संजय मंडलिक यांच्यासह काही आमदारांची या लोकसभा संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली.

शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुखाच्या नियुक्त्या-
१. खा. प्रतापराव जाधव (संपर्कनेता) – अकोला लोकसभा व बुलढाणा लोकसभा
२. आ. आशिष जयस्वाल – अमरावती लोकसभा व भंडारा-गोंदिया लोकसभा
३. खा. कृपाल तुमाने – नागपूर लोकसभा व रामटेक लोकसभा
४. किरण पांडव – वर्धा लोकसभा व गडचिरोली-चिमूर लोकसभा
५. खा. भावना गवळी (संपर्कनेत्या) – यवतमाळ-वाशीम लोकसभा व चंद्रपूर लोकसभा
६. खा. हेमंत पाटील – नांदेड लोकसभा व हिंगोली लोकसभा
७. आ. अर्जुन खोतकर – जालना लोकसभा व परभणी लोकसभा
८. गोपाळ लांडगे – छत्रपती संभाजीनगर लोकसभा
९. आ. ज्ञानराज चौगुले – धाराशिव लोकसभा व लातूर लोकसभा
१०. चंद्रकांत रघुवंशी – नंदुरबार लोकसभा व धुळे लोकसभा
११. आनंदराव जाधव – जळगाव लोकसभा व रावेर लोकसभा
१२. विजय नहाटा – दक्षिण नगर लोकसभा
१३. यशवंत जाधव – शिर्डी लोकसभा
१४. खा. श्रीरंग बारणे – मावळ लोकसभा व पुणे लोकसभा
१५. खा. शिवाजीराव आढळराव – शिरूर लोकसभा
१६. आ. विजय शिवतारे – बारामती लोकसभा
१७. आ. राजेश क्षीरसागर – सातारा लोकसभा व सांगली लोकसभा
१८. खा. संजय मंडलिक – कोल्हापूर लोकसभा
१९. योगेश जानकर – हातकणंगले लोकसभा
२०. आ. रविंद्र फाटक – पालघर लोकसभा व रामागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा
२१. भरत गोगावले – रायगड लोकसभा
२२. श्री. नरेश म्हस्के – ठाणे लोकसभा व कल्याण लोकसभा

Chandrkant Khaire : संजय राठोड पैशांशिवाय कामच करीत नव्हते…

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube