Download App

MLAs Disqualification : विधानसभा अध्यक्षांकडून अपात्रतेच्या सुनावणीत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न; अॅड असीम सरोदेंचा आरोप

  • Written By: Last Updated:

Asim Sarode on MLAs Disqualification : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर ठाकरे गटाने शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठवले होते. दरम्यान, यावर आज सुनावणी झाली. या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी एका आठवड्याची मुदत दिली. यावरून ठाकरे गटाचे वकील अॅड. असीम सरोदे यांनी अध्यक्षांकडून वेळ मारून ऩेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे.

आज सुनावणी दरम्यान, शिंदे गटाने कागदपत्रांची मागणी करताना दोन आठवड्यांचा वेळ मागितला होता. मात्र सध्या अध्यक्षांनी दोन्ही गटांना एका आठवड्याची मुदत दिली आहे. याविषयी असीम सरोदे यांना माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की, अध्यक्षांकडून वेळ मारून ऩेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व निदर्शने स्पष्टपणे दिली असतांनाही जाणीवपूर्वक विलंब लावण्याची आयडिया केली जात आहे. या प्रकरणात शिंदे गटाकडून कागदपत्रे मागवण्यात आली आहेत. सतत कुठले ना कुठले कारण सांगून हा प्रकार केला जात आहे. वरून काही सूचना आल्यानेच याप्रकरणात वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात असावा, असं सरादे यांनी सांगितलं.

Chhota Bheem Teaser: छोटा भीम रुपेरी पडद्यावर; अनुपम खेरसोबत झळकणार ‘हे’ सेलिब्रिटी 

सरोदे म्हणाले की, एकूण 40 संबंधित याचिका विधानसभा अध्यक्षांसमोर आहेत. या सर्व याचिकांवर एकत्रित निर्णय घेण्याची आमची मागणी आहे. कारण या सर्व याचिकांचा विषय एकच आहे. सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली पाहिजे. काहींनी पक्षाचा आदेश धुडकावून बाहेर पडले आहेत. त्या लोकांना सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच अपात्र ठरवले आहे. आता राहुल नार्वेकर यांनी त्यांचं पालण करावं, पण यामध्ये ते काही कागदपत्रे मागून वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे गुड गव्हर्नससाठी चांगली नाही. हा सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न आहे.

अपात्रतेची प्रक्रिया लांबली आणि विधासभा विसर्जित केल्या तर या सुनावणीचं काय होईल, असा प्रश्न विचारल्यावर सरोदे यांनी सांगितलं की, प्रक्रिया लांबवण्यचाा मुद्दाम प्रयत्न होतो. प्रक्रिया लांबली नाहीतर हे आमदार अपात्र ठरतात. अपात्र आमदारांना वजा करून संख्यबळ असेल तर सरकार टीकेल नाहीतर पडेल, असं सरोदे यांनी सांगितलं.

 

 

 

Tags

follow us